Cricket Retirement | टीमला मोठा झटका, एकाच वेळेस दोघांचा निवृत्तीचा निर्णय
वर्ल्ड कप आणि आशिया कपसारखी मोठी स्पर्धा तोंडावर असताना अचानक दोन खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केल्याने सर्वत्र याची चर्चा होत आहे. एकाच संघाकडून दोन्ही खेळाडू खेळतात.
मुंबई : टीम इंडिया आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून त्यानंत आशिया कप आणि एकदिवसीय वर्ल्ड कपसारखे मोठे इव्हेंट आहेत. टीम इंडियामध्ये वर्ल्ड कप होणार असल्याने ते विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र त्याआधी आशिया कप होणार असून क्रिकेटप्रेमी पाकिस्तान आणि भारत हा हायव्होल्टेज सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी टीममध्ये कोणाला स्थान मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच पाकिस्तान संघाच्या दोन खेळाडूंबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
कोण आहेत एकाच वेळी निवृत्ती घेणारे खेळाडू?
आशिया कप आणि एकदिवसीय वर्ल्ड कप या दोन मोठ्या स्पर्धांआधी दोन बड्या खेळाडूंनी निवृत्ती जाीहर केली आहे. एहसान आदिल आणि अष्टपैलू हम्माद आझम असं निवत्ती घेतलल्या खेळाडूचं नाव आहे. यासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ट्विटरवर माहिती देण्याती आलीये. दोन्ही खेळाडूंचे बोर्डाने आभार मानले आहेत.
Thank you for your services, Ehsan Adil and Hammad Azam! Wishing you both well for future endeavours.
Read more ➡️ https://t.co/Z4bBthUohx pic.twitter.com/LtjwriU20I
— Pakistan Cricket (@TheRealPCB) July 9, 2023
2013 साली दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सेंच्युरियनला एहसास आदिलने कसोटी पदार्पण केलं होतं. त्याने फक्त दोन कसोचीटी सामने आपल्या संघासाठी खेळले. यामध्ये आदिलने 5 विकेट्स घेतल्या. त्यासोबतच आदिलने 5 वनडे सामने खेळले यामध्ये त्याने 4 विकेट्स घेतल्या. आदिलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 67 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 245 विकेट्स, 67 लिस्ट ए सामन्यांमध्ये 98 बळी आणि 68 टी-20 सामन्यांमध्ये 86 विकेट्स घेतल्या होत्या.
हम्माद आझमने पाकिस्तानसाठी 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन विकेट घेतल्या आणि 80 धावा केल्या. 5 टी-20 सामनेही त्याने खेळले आहेत. 107 प्रथम श्रेणी सामने खेळताना 4953 धावा करत 75 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, वर्ल्ड कप आणि आशिया कपसारखी मोठी स्पर्धा तोंडावर असताना अचानक दोन खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केल्याने सर्वत्र याची चर्चा होत आहे. पाकिस्तानकडे यंदाच्या आशिया कपचं यजमानपद आहे. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी नकार दर्शवल्याने टीम इंडियाचे सामने दुसरीकडे खेळवण्यात येणार आहेत