हुश्शsss! अंडर 19 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशनं पाकिस्तानचे बारा वाजवलेच होते, पण झालं असं की…

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी चार संघ ठरले आहेत. सुपर सिक्सच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानची वाट अडवलीच होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अखेर पाकिस्तानला उपांत्य फेरीत स्थान मिळालं आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहे.

हुश्शsss! अंडर 19 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशनं पाकिस्तानचे बारा वाजवलेच होते, पण झालं असं की...
पाकिस्तान बाल बाल बचा! बांगलादेशने अंडर 19 वर्ल्डकपमध्ये खाट टाकलीच होती, शेवटी झालं असं की..
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 9:12 PM

मुंबई : अंडर 19 वर्ल्डकपमध्ये सुपर सिक्सच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला चांगलाच घाम फोडला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकणार? याची उत्सुकता लागून होती. पण पाकिस्तानने अवघ्या 5 धावांनी बांगलादेशवर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. करो या मरोच्या लढाईल बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. अपेक्षेप्रमाणे गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 155 धावांवर तंबूत पाठवला आणि विजयासाठी 156 धावांचं आव्हान मिळालं. पण नेहमीप्रमाणे बांगलादेशच्या फलंदाजांनी नांगी टाकली. तळाच्या फलंदाजांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली. पण 6 धावा कमी पडल्या आणि उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं. पाकिस्तानने 40.4 षटकात सर्व गडी बाद 155 धावा केल्या आणि बांगलादेशला 35.5 षटकात सर्व गडी बाद 150 धावा करता आल्या. पाकिस्तानच्या उबैद शाह याने बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याला साथ लाभली ती अली रझाची..

बांगलादेशपुढे फक्त 156 धावांचं आव्हान असताना पाकिस्तानने भेदक गोलंदाजी केली. उबैद शाह आणि अली रझाने पाकिस्तानची लाज राखली. दोघांनी मिळून बांगलादेशच्या 8 विकेट्स घेतल्या. उबैद शाहने 10 षटकात 44 धावा देत 5 गडी बाद केले. तसेच एक षटक निर्धाव टाकलं. तर अली रझाने 10 षटकात 44 धावा देत 3 गडी बाद केले. तर मोहम्मद झीशानला एक गडी बाद करण्यात यश आलं. त्याचबरोबर मोहम्मद इकबाल हा धावचीत झाला.

उपांत्य फेरीत भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होणार आहे. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामना 6 फेब्रुवारीला, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना 8 फेब्रुवारीला होणार आहे. जर भारत आणि पाकिस्तान यांनी उपांत्य फेरीचा सामना जिंकला. तर अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडतील. अंतिम फेरीचा सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेश अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आशिकुर रहमान शिबली (विकेटकीपर), जिशान आलम, चौधरी मोहम्मद रिझवान, अरिफुल इस्लाम, अहरार अमीन, मोहम्मद शिहाब जेम्स, शेख पावेझ जिबोन, महफुजुर रहमान रब्बी (कर्णधार), रोहनत दौल्ला बोरसन, मोहम्मद इक्बाल हुसेन एमोन , मारुफ मृधा

पाकिस्तान अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): शमिल हुसेन, शाहजेब खान, अझान अवेस, साद बेग (कर्णधार/विकेटकीपर), अहमद हसन, हारून अर्शद, अराफत मिन्हास, उबेद शाह, मोहम्मद झीशान, अली असफंद, अली रझा

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.