PAK vs BAN : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचं भवितव्य ठरणार, उपांत्य फेरीचं गणित समजून घ्या

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 31 वा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होत आहे. या सामन्यावर पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं गणित अवलंबून आहे. निकालाचा पाकिस्तान संघावर कसा फरक पडेल ते समाजून घ्या.

PAK vs BAN : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचं भवितव्य ठरणार, उपांत्य फेरीचं गणित समजून घ्या
PAK vs BAN : पाकिस्तानच्या उपांत्य फेरीची वाट बांगलादेश अडवणार? कसं आहे समीकरण ते जाणून घ्या
Follow us
| Updated on: Oct 30, 2023 | 2:56 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सहावा टप्प्यातील शेवटचा सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होत आहे. म्हणजेच प्रत्येक संघाचे प्रत्येकी सहा सामने झाले आहेत. पाकिस्तान बांगलादेश सामन्यापासून सातव्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या टप्प्यात उपांत्य फेरीचं गणित स्पष्ट होणार आहे. कारण भारत सोडलं तर सात संघांची उपांत्य फेरीसाठी चुरस आहे. त्यामुळे एक पराभव स्वप्न धुळीस मिळवू शकतं. पाकिस्तान आणि बांगलादेश सामना असाच निकाल देणारा ठरणार आहे. कारण बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. पण पाकिस्तानची उपांत्य फेरीची वाट अडवू शकतो. पाकिस्तान 4 गुण आणि -0.387 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. तर साखळी फेरीत अजूनही 3 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे तिन्ही सामन्यात विजय मिळवला तर 6 गुण मिळतील आणि एकूण 10 गुण होतील. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका सोडलं तर एकाही संघाचे 10 गुण नाहीत. त्यामुळे उपांत्य फेरीची शक्यत आहे.

उपांत्य फेरीचं गणित समजून घेऊयात

गुणतालिकेत भारताचे 12 गुण असून उपांत्य फेरीचं गणित सुटलं आहे. उर्वरित तीन सामने गमावले तरी भारत चौथ्या स्थानावर राहील. कारण पाचव्या स्थानापासून स्थानापासून पुढे असलेल्या संघांना 12 गुण मिळवणं कठीण आहे. जरी मिळवले तरी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचं कठीण होईल. त्यामुळे भारताला तसा धक्का पोहोचणार नाही. भारताचे उर्वरित तीन सामने श्रीलंका, दक्षिण अफ्रिका आणि नेदरलँड या संघांशी आहेत.

दुसरीकडे, पाकिस्तानचे उर्वरित तीन सामने बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडशी आहे. त्यामुळे एक पराभव उपांत्य फेरीचं गणित खराब करू शकतं. त्यामुळे तिन्ही सामन्यात विजय मिळवून नेट रनरेट चांगला ठेवणं गरजेचं आहे. पाकिस्तानने स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकले.मात्र त्यानंतर सलग 4 सामने गमवल्याने उपांत्य फेरीचं गणित जर तर वर अवलंबून आहे.

पाकिस्तान बांगलादेशला सहज पराभूत करेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केलं तर गुणतालिकेत जबरदस्त चुरस निर्माण होईल. त्यामुळे श्रीलंका अफगाणिस्तान या संघांना संधी मिळू शकते. म्हणजेच सातव्या टप्प्यात उपांत्य फेरीची लढाई जर तर वर आली आहे असंच म्हणावं लागेल.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.