BCCI | महेंद्रसिंह धोनी याला बीसीसीआयमध्ये मिळणार ‘ही’ जबाबदारी?

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात टी 20 आणि वनडे वर्ल्ड कप तसेच चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली आहे.

BCCI | महेंद्रसिंह धोनी याला बीसीसीआयमध्ये मिळणार 'ही' जबाबदारी?
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 9:41 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वात एका वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनंतर एकच खळबळ उडाली आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. टीम इंडियाचे खेळाडू हे फिटनेससाठी इंजेक्शन घेतात, असा गौप्यस्फोट शर्मा यांनी केला. बीसीसीआयने आतापर्यंत शर्मा यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र शर्मा यांना निवड समिती प्रमुख पद सोडावं लागेल, असं म्हटलं जात आहे. अशात एका दिग्गज खेळाडूने निवड समिती प्रमुख म्हणून टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचं नाव सुचवलं आहे.

चेतन शर्मा अडचणीत

चेतन शर्मा यांनी अनेक गौप्यस्फोट या स्टिंगमध्ये केले. त्यानंतर शर्मा यांचं पद धोक्यात आलं आहे. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. त्यानंतर शर्मा यांना निवड समिती प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं. मात्र 2 महिन्यांनी पुन्हा त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली. या स्टिंगनंतर शर्मा यांनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतलीय. या सर्व दरम्यान शेजारील देशातून एक सूचना देण्यात आली आहे.

निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी धोनीचं नाव

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानेश कनेरिया याने बीसीसाआयला सूचना केली आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला निवड समितीचा प्रमुख करा, अशी सूचना कनेरिया याने केली आहे.

कनेरिया काय बोलला?

“महेंद्रसिंह धोनी याच्यासोबत बीसीसीआय अधिकाऱ्यांसह एकदा बोलायला हवं. अधिकाऱ्यांनी धोनीचा प्लान काय आहे हे जाणून घ्यायला हवं. तसेच धोनी निवड समिती प्रमुख बनायला तयार आहे का, हे माहित करुन घ्यायला हवं. आता वेळ आली आहे की, बीसीसीआय, अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी कडक कारवाई करत पुन्हा नव्याने निवड समिती तयार गठीत करायला हवी”, असं कनेरिया एका मुलाखतीत म्हणाला.

धोनीचं तोंडभरून कौतुक

कनेरिया याने धोनीचं तोंडभरून कौतुक केलं. “बीसीसीआयने निवड समितीत नवीन चेहऱ्यांचा समावेश करायची गरज आहे. धोनी बुद्धीमान आहे. तो एक शानदार खेळाडू आहे. असं सर्व असताना त्याच्यासारखा खेळाडू निवड समितीत का नाही?”, असा सवालही कनेरिया याने उपस्थित केला.

शुक्रवारपासून दुसरी कसोटी

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा शुक्रवार 17 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडिया 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.