‘वहीं उन्हें मारके आओ…’, Champions Trophy 2025 वरुन अख्तर भारताबाबत जास्तचं बोलला, पाहा व्हायरल व्हीडिओ
Shoaib Akhtar Icc Champions Trophy 2025 : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनावरुन सुरु असलेल्या वादावर बोलला आहे. अख्तरने या दरम्यान व्यक्त होताना भारताबाबत नको तसं बोलला आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या वादावरुन प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. मात्र बीसीसीआय सुरक्षेच्या कारणाने टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवणार नाही, या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे आयसीसीने पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला. पीसीबीने आधी याबाबत नकार दिला, मात्र आता पाकिस्तानने हायब्रिड मॉडेलसाठी सहमती दर्शवली आहे. मात्र पाकिस्तानने काही अटी ठेवल्या आहेत.
पीसीबीच्या अटी काय?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रेव्हेन्यूचा जास्त भाग मिळायला पाहिजे. तसेच भविष्यात कोणत्याही स्पर्धेसाठी पाकिस्तान भारत दौऱ्यावार जाणार नाही. तसेच भविष्यात भारतात होणाऱ्या आयसीसी स्पर्धेचं हायब्रिड मॉडेलनुसार आयोजन करण्यात यावं, अशा अटी पीसीबीने आयसीसीसमोर ठेवल्या आहेत. शोएब अख्तरने पाकिस्तानमधील एका वाहिनीवर बोलताना त्याचं मत मांडलं. हायब्रिड मॉडेलमुळे जास्त रेव्हेन्यू मिळावा, या पीसीबीच्या अटीला शोएबने समर्थन दर्शवलं. तसेच या दरम्यान शोएब असं काही म्हणाला जे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
शोएब अख्तर काय म्हणाला?
“तुम्हाला यजमानपदाचा मान आणि रेव्हेन्यू मिळतोय. हे ठीक आहे. आम्ही पण हे समजतो. पाकिस्तानची भूमिका योग्य आहे. एक मजबूत स्थिती बनवायला हवी होती, का नाही? आम्ही देशात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात सक्षम असतो आणि ते यायला तयार होत नाहीत, तर त्यांना आमच्यासोबत रेव्हेन्यू शेअर करायला हवा. हा एक योग्य निर्णय आहे”, असं अख्तरने म्हटलं.
‘वहीं उन्हें मारके आओ’
पीसीबीने पाकिस्तान टीमला भारतात आयसीसी स्पर्धेसाठी पाठवायला हवं. मात्र टीम इंडियाला पाकिस्तान त्यांच्याच घरात पराभूत करु शकेल, अशी भक्कम टीम तयार करायला हवी, या मताचा अख्तर आहे.
शोएब अख्तरचा व्ही़डिओ व्हायरल
Hybrid Model pehle decide ho gaya tha. Shoaib Akhtar VC PTV sports official pic.twitter.com/6nZEthwHH3
— iffi Raza (@Rizzvi73) December 1, 2024
भविष्यात भारतात खेळण्याबाबत आम्ही हात पुढे केला पाहिजे आणि तिथे जायला हवं. माझं नेहमी हेच म्हणणं आहे की भारतात जा आणि त्यांना तिथेच पराभूत करा. भारतात खेळा आणि त्यांना (‘वहीं उन्हें मारके आओ) तिथेच पराभूत करुन या “, असं अख्तरने म्हटलं.