Video : बिग बॅश लीगमध्ये पाकिस्तानच्या हारिस रऊफचा ड्रामा, अवतार पाहून पंचांचा संताप
बिग बॅश लीग स्पर्धेत पुन्हा एकदा ड्रामा पाहायला मिळाला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ फलंदाजीसाठी आहे त्याच अवस्थेत मैदानात उतरला. विना ग्लोव्ह आणि पॅड फलंदाजीसाठी आला. त्यामुळे मैदानात उपस्थित असलेले सर्वच लोक आवाक् झाले.
मुंबई : बिग बॅश लीगच्या 12 व्या पर्वात सिडनी थंडर आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात एक विचित्र ड्रामा पाहायला मिळाला. मेलबर्न स्टार्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात शेवटच्या सामन्यात विचित्र घटना पाहायला मिळाली. मेलबर्न स्टार्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 10 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान सिडनी थंडरने 5 गडी गमवून 18.2 षटकात पूर्ण केलं. पण या सामन्यात मेलबर्न स्टार्स फलंदाजी करत असताना एक विचित्र घटना पाहायला मिळाली. पाकिस्तानचा हारिस रउफ विना ग्लोव्ह्ज आणि पॅड मैदानात उतरला. यामुळे मैदानातील उपस्थित प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. 19 षटकापर्यंत 6 गडी बाद 168 धावा होत्या. पण शेवटचं षटक डेनियल सॅम्सने टाकलं आणि सर्वच गणित फिस्कटलं. त्यामुळे हारिस रउफ शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानात उतरावं लागलं. पण त्याची स्थिती पाहून पंचांनी संताप व्यक्त केला.
शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 59 धावा करून वेबस्टर डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर उस्मान मीर मैदानात उतरला तसाच डॅनियल सॅम्सने तंबूत पाठवलं. त्यानंतर चेंडूवर स्टेकेटी धावचीत होत तंबूत परतला. त्यामुळे हारिस रऊफला शेवटचा चेंडूसाठी मैदानात उतरावं लागलं आहे. शेवटच्या चेंडूवर लियाम डावसन स्ट्राईकला होता. डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर लियाम डावसन त्रिफळाचीत झाला. पण नॉन स्ट्राईकला असलेल्या हारिस रउफला पाहून आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याने ग्लोव्ह्ज आणि पॅड घातले नव्हते.
No gloves, pads or helmet on 🤣
Haris Rauf was caught by surprise at the end of the Stars innings!@KFCAustralia #BucketMoment #BBL13 pic.twitter.com/ZR9DeP8YhW
— KFC Big Bash League (@BBL) December 23, 2023
मेलबर्न स्टार्सने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट आणि एलेक्स हेल्स ही जोडी मैदानात उतरली. त्यांनी 78 धावांची भागीदारी केली. त्यानंतर एलेक्स हेल्स 40 धावा करून बाद झाला. त्यानंतर कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट लगेचच बाद झाला. त्यानंतर जेसने 19, ओलिव्हर डेविस 23, एलेक्स रोसने 17, डॅनियल सॅम्सने नाबाद 22 आणि नाथन मॅकअँड्र्यू नाबाद 13 धावा केल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
सिडनी थंडर (प्लेइंग इलेव्हन): कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट (विकेटकीपर), एलेक्स हेल्स, जेसन संघा, ऑलिव्हर डेव्हिस, अॅलेक्स रॉस, डॅनियल सॅम्स, नॅथन मॅकअँड्र्यू, ख्रिस ग्रीन (कर्णधार), लियाम हॅचर, जमान खान, तनवीर संघा
मेलबर्न स्टार्स (प्लेइंग इलेव्हन): सॅम हार्पर (विकेटकीपर), थॉमस रॉजर्स, ब्यू वेबस्टर, ग्लेन मॅक्सवेल (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, हिल्टन कार्टराईट, जोनाथन मर्लो, लियाम डॉसन, उसामा मीर, मार्क स्टीकेटी, हरिस रउफ.