Asia Cup 2023 पाकिस्तानमध्येच होणार! टीम इंडियाची भूमिका काय?

आशिया कप 2023 स्पर्धेच्या आयोजनावरुन गेल्या अनेक महिन्यांपासून बीसीसीआय आणि पीसीबीवरुन वाद सुरु होता. मात्र अखेर या वादावर पडदा पडल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्सकडून मिळाली आहे. जाणून घ्या ...

Asia Cup 2023 पाकिस्तानमध्येच होणार! टीम इंडियाची भूमिका काय?
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 12:57 AM

मुंबई | टीम इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत खेळतात. आशिया कपच्या आयोजनावरुन गेल्या 6 महिन्यांपासून वाद सुरु होता. आम्ही पाकिस्तानात जाणार नाही, अशी भूमिका बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट समितीचे अध्यक्ष जय शाह यांनी घेतली होती. तर टीम इंडिया पाकिस्तानात आली नाही, तर आम्हीही आगामी एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी भारतात जाणार नाही, अशी आडमूठी भूमिका ही पाकिस्तानने घेतली होती. अखेर या वादावर पडदा पडल्याचं दिसून येत आहे. अखेर पाकिस्तान आणि बीसीसीआय यो दोन्ही क्रिकेट बोर्डाचं एकमत झाल्याचं समजतंय. रिपोर्टनुसार, सप्टेंबर 2023 मध्ये आशिया कपचं यजमानपद हे पाकिस्तानच करणार आहे. मात्र टीम इंडिया पाकिस्तान खेळणार नाही.

ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये वर्ल्ड कपआधी आशिया कप स्पर्धा होणार आहे. मात्र त्याआधी गेल्या ऑक्टोबर 2022 पासून आशिया कप आयोजनाचा वाद सुरु होता. पाकिस्तानमध्ये स्पर्धेच्या आयोजनावरुन बीसीसीआयने हरकत घेत आम्ही खेळाडूंना पाठवणार नसल्याची भूमिका घेतली. यावरुन त्तकालिन पीसीबीप्रमुख रमीज राजा यानेही आम्ही पण (पाकिस्तान) भारतात वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यानंतर विद्यमान पीसीबी अध्यक्ष नजीम सेठी यांनी यजमानपदावरुन मध्यस्थीचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी एसीसी प्रमुख जय शाह आणि त्यानंतर आयसीसीच्या बैठकीतही उपस्थिती लावली.

मात्र आता पीसीबी आणि बीसीसीआय या दोन्ही क्रिकेट बोर्डांनी सहमती दर्शवल्याचं समजत आहे. ईएसपीएन-क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्येच आयोजन होणार असल्याची शक्यता आहे. या शक्यतेमागे मोठं कारण आहे. ते म्हणजे पाकिस्तानसह दुसऱ्या देशातही स्पर्धेचं आयोजन करण्यावरुन पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यात एकमत झालंय. रिपोर्टमध्ये म्हटलंय त्यानुसार, पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामने हे त्रयस्थ ठिकाणी होणार असल्याच म्हटलं जातंय.

हे सुद्धा वाचा

दुसरं ठिकाण कोणतं?

आता टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामने कुठे खेळवण्यात येणार हे तरी स्पष्ट नाही. मात्र यासाठी यूएई आणि श्रीलंकेची नाव आघाडीवर आहेत. तसेच ओमान आणि आश्चर्यकारक म्हणजे इंग्लंडचंही नाव चर्चेत आहेत. यामुळे पाकिस्तानसह यजमानपद मिळवणारा दुसरा देश कोणता ठरणार हे संबंधित देशातील हवामान आणि इतर गोष्टींवर अवलंबून असणार आहे.

टीम इंडिया-पाकिस्तान 3 वेळा आमनेसामने?

आशिया कप स्पर्धेत एकूण 6 सहभागी होणार आहेत. या 6 संघांची विभागणी एकूण 2 ग्रुपमध्ये प्रत्येकी 3-3 या पद्धतीने होणार आहे. या एका ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान आणि 1 क्वालिफायर टीम असणार आहे. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. दोन्ही ग्रुपमधून टॉपच्या 2 टीम या सुपर 4 मध्ये पोहचतील. इथे प्रत्येक टीम एकमेकांशी भिडतील. त्यानंतर 2 संघ अंतिम फेरीत पोहचतील. त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात किमान 2 आणि कमाल 3 वेळा मॅच होऊ शकतात. स्पर्धेत एकूण 13 सामने खेळवण्यात येणार आहेत. यापैकी टीम इंडिया 5 सामने खेळणार आहे, ज्यांचं आयोजन हे पाकिस्तानऐवजी त्रयस्थ ठिकाणी होणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.