Cricket | तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी टीममध्ये भयंकर बदल, कुणाला डच्चू?
Cricket | आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या हिशोबाने क्रिकेट संघ तयारीला लागले आहेत. त्यानुसार प्रत्येक टीम प्लानिंग करत आहे. त्यात आता तिसऱ्या टी 20 सामन्याच्या काही तासाआधी प्लेईंग ईलेव्हन जाहीर करण्यात आली आहे.
ऑकलंड | पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरिज खेळत आहे. न्यूझीलंडने सलग 2 सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यामुळे पाकिस्तान 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे. आता तिसरा आणि निर्णायक सामना हा 17 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तान टीम भयंकर अडचणीत सापडली आहे. एका बाजूला सलग 2 पराभव झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला खेळाडू दुखापतीच्या कचाट्यात फसले आहेत, त्यामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलंय. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वात पाकिस्तान विजयाच्या प्रतिक्षेत आहे. या दरम्यान पाकिस्तानने तिसऱ्या टी 20 सामन्याच्या एक दिवसआधी प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली आहे. या प्लेईंग ईलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत.
तिसऱ्या सामन्यासाठी पाकिस्तानकडून 3 बदल
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हनमध्ये अब्बास अफ्रिदी याच्या जागी जमां खान याचा समावेश करण्यात आला आहे. अब्बास दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. या व्यतिरिक्त पाकिस्तानने 2 बदल केले आहेत. कॅप्टन शाहीन आफ्रिदी याने ओसामा मीर आमि आमेर जमाल या दोघांना प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी दिलेली नाही. या दोघांना प्लेईंग ईलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यांच्या जागी मोहम्मद नवाझ आणि मोहम्मद वसीम ज्यूनिअरला संधी देण्यात आली आहे. पाकिस्तानने अशाप्रकारे संपूर्ण बॉलिंगच अटॅकच बदलला आहे.
तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेईंग ईलेव्हन | शाहीन आफ्रिदी (कॅप्टन), सैम अयुब, मोहम्मद रिझवान, बाबर आझम, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आझम खान (विकेटकीपर), जमां खान, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वसीम ज्यूनिअर आणि हरिस रौफ.
पाकिस्तान क्रिकेट टीमच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण कोण?
🚨 Pakistan’s playing XI for the third T20I 🚨#NZvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/eMkUcP1l1L
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 16, 2024
न्यूझीलंड टीम | फिन एलन, डेवोन कॉनव्हे (विकेटकीपर), विल यंग, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिचेल सेंटनर, एडम मिल्ने, टीम साउथी, ईश सोढी, बेन सियर्स, मॅट हेनरी आणि टीम सायफर्ट.