AUS vs PAK : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला आणखी एक झटका

Australia vs Pakistan Test | टीम इंडियाच्या माजी खेळाडूने पाकिस्तान टीम च्या प्रत्येक खेळाडूला वैयक्तिक दणका दिला आहे. टीम इंडियाच्या या माजी खेळाडूमुळे पाकिस्तानच्या खेळाडूला मानधनाच्या 10 टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.

AUS vs PAK : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला आणखी एक झटका
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 6:55 PM

कॅनबेरा | पाकिस्तान क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पाकिस्तान या दौऱ्यावर एकूण 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 360 धावांनी पराभूत करत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पाकिस्तानला या पराभवासह दुहेरी झटका लागला आहे. आयसीसीने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे पाकिस्तानची अडचण आणखी वाढली आहे.

पाकिस्तानची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण झाली. त्यामुळे टीम इंडियाला फायदा झाला. टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहचली. पाकिस्तानला पराभवासह दुसरं स्थान गमवावं लागलं. त्यानंतर आता आयसीसीने पाकिस्तानला झटका दिलाय. आयसीसीने पाकिस्तानला ओव्हर रेट न राखल्यामुळे दंडात्मक कारवाई केली आहे. आयसीसीने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

आयसीसीने पाकिस्तानवर स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूला सामन्याच्या मानधनाच्या 10 टक्के रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागणार आहे. इतकंच नाही, तर आयसीसीने 2 पॉइंट्सही कमी केले आहेत. त्यामुळे आता ताज्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानचे पॉइंट्स 66.67 वरुन 61.11 इतके झाले आहेत.

पाकिस्तानवर मोठी कारवाई

पाकिस्तानवर आयसीसीच्या 2.22 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या 2.22 मध्ये स्लो ओव्हर रेटच्या कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. या नियमानुसार, कोणती टीम एका ओव्हरसाठी निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ घेत असेल, तर प्रत्येक खेळाडूला एका ओव्हरसाठी मानधनाच्या 5 टक्के रक्कम आकारण्यात यावा. त्यानुसार पाकिस्तानने 2 ओव्हर टाकण्यात विलंब केला. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना 10 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आलाय. तसेच आयसीसी wtcच्या 16.11 .2 नुसार प्रति 1 ओव्हर विलंब झाल्या 1 पॉइंट कमी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार 2 पॉइंट्स कमी केले गेले.

माजी भारतीय खेळाडूकडून पाकिस्तानला दणका

दरम्यान टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि विद्यमान सामनाधिकारी अर्थात मॅच रेफरी जवागन श्रीनाथ यांनी पाकिस्तानवर ही कारवाई केली आहे. सामना नियमांनुसार होतो की नाही, हे पाहण्याची जबाबदारी मॅच रेफरीवर असते. पाकिस्तानवर लेट ओव्हर केल्याचा आरोप हा फिल्ड आणि थर्ड-फोर्थ अंपायरकडून करण्यात आला. त्यानंतर श्रीनाथ यांनी ही कारवाई केली.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.