PAK vs IND | Shubman Gill याचा हलवा कॅच घेण्याची संधी ‘ड्रॉप’, पाकिस्तानची फ्लॉप फिल्डिंग

Iftikhar Ahmed Missed Shubman Gill Catch | पाकिस्तानने त्यांच्या फ्लॉप फिल्डिंगचा नजारा पुन्हा एकदा दाखवला आहे. पाहा शुबमन गिल याचा सोपा कॅच कसा सोडला तो.

PAK vs IND | Shubman Gill याचा हलवा कॅच घेण्याची संधी 'ड्रॉप', पाकिस्तानची फ्लॉप फिल्डिंग
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 4:51 PM

कोलंबो | पाकिस्तान क्रिकेट टीम आणि त्यांची फिल्डिंग म्हणजे विषयच नाही. पाकिस्तान काही तासांआधी वनडे क्रिकेटमधील नंबर 1 टीम होती. पाकिस्तानने गेल्या काही वर्षात आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा केली. मात्र पाकिस्तानला आपल्या फिल्डिंग मध्ये काय बदल करता आलेला नाही. इतक्या वर्षांमध्ये क्रिकेट विश्वात काही बदललं नसेल तर ती पाकिस्तानची फिल्डिंग. पाकिस्तानच्या या ढिसाळ आणि फ्लॉप फिल्डिंगचा नजारा क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर 4 सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानच्या खेळाडूंनी आमची फिल्डिंग सुधरुच शकत नाही, हे पुन्हा सिद्ध करुन दाखवलं.

पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात आली. पाकिस्तानच्या खेळाडूंनी शुबमन गिल या 1 नाही तब्बल 2 जीवनदान दिले. शुबमनला आऊट करण्याची संधी पाकिस्तान घालवली. त्यामुळे पाकिस्तान आणि त्यांची फिल्डिंग हा विषय पुन्हा चर्चेत आला. यामुळेच पाकिस्तानला पुन्हा एकदा टीका सहन करावी लागली आहे.

हे सुद्धा वाचा

नक्की काय झालं?

नसीम शाह टीम इंडियाच्या इनिंगमधील आठवी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर शुबमनच्या बॅटला कट लागला. बॉल कट लागून पहिल्या आणि दुसऱ्या स्लिपच्या मधून गेला. पहिल्या स्लीपला इफ्किखार अहमद होता. हा कॅच इफ्तिखार अहमद यानेच घ्यायचा होता. मात्र इफ्तिखार आणि सेकंड स्लीपमध्ये असेलल्या खेळाडूत तु घे मी घे असा घोळ झाल्याने गेम झाला. त्यामुळे शुबमनला जीवनदान मिळालं.

पाकिस्तानची फिल्डिंग बघा

त्याआधी टीम इंडियाच्या डावातील दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर शुबमनला पहिलं जीवनदान मिळालं. नसीम शाह याने दुसऱ्या ओव्हरमधील पहिला बॉल टाकला. शुबमनचा या मॅचमधील पहिला बॉल होता. शुबमनने जोरात फटका मारला. शुबमनने मारलेला फटका थर्ड मॅनच्या दिशेने शाहिन आफ्रिदीकडे गेला.कॅच तसा सोपा नव्हता. मात्र झाला असता तर शुबमन आऊट होता. त्यामुळे शुबमनला पहिल्याच बॉलवर जीवनदान मिळालं. शाहीनने हा कॅच घेतला असता, तर त्याला झिरोवर माघारी जावं लागलं असतं.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.