ENG vs PAK | पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधून अधिकृत पॅकअप! पहिल्या सेमी फायनलचं ठिकाण निश्चित
Pakistan Cricket Team | पाकिस्तान क्रिकेट टीमच्या वनडे वर्ल्ड कपमधील प्रवासाला अखेरच्या सामन्याआधीच ब्रेक लागला आहे. पाकिस्तानची या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये कामगिरी कशी राहिली हे जाणून घ्या.
कोलकाता | पाकिस्तान क्रिकेट टीमचा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधून बाजार उठला आहे. पाकिस्तानचं सेमी फायनलमध्ये पोहचण्याचं स्वप्न भंग झालं आहे. कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील 44 व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडने टॉस जिंकला. कॅप्टन जोस बटलर याने बॅटिंगचा निर्णय केला. इथेच पाकिस्तानची सेमी फायनलसाठी असलेली उरलीसुरली आशाही संपली.
पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांपैकी 4 सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर 4 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय. पाकिस्तानला न्यूझीलंडला पछाडून सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी मोठ्या अंतराने सामना जिंकायचा होता. मात्र इंग्लंडच्या बॅटिंगचा निर्णयामुळे समीकरण फिस्कटलं. पाकिस्तानचं समीकरण कसं बिघडलं हे समजून घेऊयात.
पाकिस्तानचे 8 पॉइंट्स आहेत. तर न्यूझीलंडचे 9 सामन्यांमध्ये 10 पॉइंट्स आहेत. पाकिस्तानने इंग्लंड विरुद्धचा सामना जिंकूनही काही फायदा नाही. कारण पाकिस्तानचा नेट रनरेट हा न्यझीलंडच्या तुलनेत कमीच राहणार आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट हा +0.743 इतका आहे. तर पाकिस्तानचा नेट रनरेट +0.036 असा आहे.
पाकिस्तानससाठी सेमी फायनलच अशक्य समीकरण
इंग्लंडने 50 धावांचं आव्हान दिल्यास 2 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागणार. इंग्लंडने 100 धावांचं आव्हान दिल्यास 2.5 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागणार. इंग्लंडने 150 धावांचं आव्हान दिल्यास 3.4 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागणार. इंग्लंडने 200 धावांचं आव्हान दिल्यास 4.3 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागणार. इंग्लंडने 300 धावांचं आव्हान दिल्यास 6.1 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागणार.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गेस ऍटकिन्सन आणि आदिल रशीद.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रौफ.