पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने निवडली ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, भारताच्या एकाच खेळाडूला स्थान

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. 11 खेळाडूंच्या यादीत फक्त एकाच भारतीय खेळाडूला स्थान मिळालं आहे. तर पाच खेळाडू पाकिस्तानचे, चार खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आणि एक खेळाडू दक्षिण अफ्रिकेचा आहे. या संघात विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीला स्थान मिळालेलं नाही.

पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने निवडली ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, भारताच्या एकाच खेळाडूला स्थान
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 4:40 PM

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीन ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. या संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू निवडले आहे. जास्तीत जास्त पाकिस्तानच्या खेळाडूंना त्याने संघात स्थान दिलं आहे. पाकिस्तानच्या पाच खेळाडूंना स्थान मिळालं आहे. यात इंझमाम उल हक, सईद अन्वर, रशीद लतीफ, वसीम अक्रम आणि शोएब अख्तर यांचं नाव आहे. इंझमाम उल हकला ऑल टाईम प्लेइंग इलेव्हनचा कर्णधार जाहीर केलं आहे. तर ऑस्ट्रेलियाचे चार खेळाडू संघात आहेत. यात एडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, ग्लेन मॅक्ग्रा आणि शेन वॉर्नला स्थान मिळालं आहे. विशेष म्हणजे संघात एडम गिलख्रिस्ट असताना विकेटकीपर म्हणून रशीद लतीफला स्थान दिलं आहे. रशीद लतीफचा रेकॉर्ड हा इतर विकेटकीपरच्या तुलनेत तितका चांगला नाही. तरीही रशीद लतीफला संघात स्थान दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भारताकडून एकमेव दिग्गज खेळाडू असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला स्थान मिळालं आहे. तसेच विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूंना डावललं आहे. तसेच शाहिद आफ्रिदी स्वत: देखील या संघात नाही.

पाकिस्तानचा माजी क्रिकेट सईद अन्वर आणि एडम गिलख्रिस्ट ओपनिंगला येतील. यापैकी एक खेळाडू बाद झाला की रिकी पाँटिंग बाजू सावरेल. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला चौथ्या स्थानावर मान मिळेल. पाचव्या स्थानावर इंझमाम उल हक उतरेल. सहाव्या क्रमांकासाठी अष्टपैलू जॅक कॅलिसला संधी दिली आहे. सातव्या क्रमांकावर विकेटकीपर बॅट्समन म्हमून रशीद लतीफ उतरेल. वेगवान गोलंदाजीची धुरा वसीम अक्रम, शोएब अख्तर, ग्लेन मॅक्ग्राच्या खांद्यावर असेल. तर फिरकीची जबाबदारी शेन वॉर्न सांभाळेल.

शाहिद आफ्रिदीची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन : सईद अन्वर (पाकिस्तान), एडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया), सचिन तेंडुलकर (भारत), इंझमाम उल हक (कर्णधार/पाकिस्तान), जॅक कॅलिस (दक्षिण अफ्रिका), रशीद लतीफ (विकेटकीपर/पाकिस्तान), वसीम अक्रम (पाकिस्तान), ग्लेन मॅक्ग्रा (पाकिस्तान), शोएब अख्तर (पाकिस्तान), शेन वॉरन (ऑस्ट्रेलिया).

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...