दुखापतीनंतर या स्टार खेळाडूंचं टीममध्ये कमबॅक, कसोटी मालिकेसाठी निवड
Cricket | या स्टार गोलंदाजाची दुखापतीनंतर एन्ट्री झाली आहे. दुखापतीमुळे हा खेळाडू गेल्या अनेक महिन्यांपासून टीममधून बाहेर होता.
मुंबई : क्रिकेट टीम इंडियाचा स्टार आणि प्रमुख बॉलर यॉर्कर किंग जस्प्रीत बुमराह दुखापतीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बाहेर आहे. बुमराहलला या दुखापतीमुळे आयपीएल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल या आणि अशा बऱ्याच क्रिकेट स्पर्धांना मुकावं लागलं. मात्र आता जसप्रीत बुमराहसारख्याच घातक गोलंदाजाची टीममध्ये दुखापतीनंतर एन्ट्री झाली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि टीम मॅनेजमेंटममध्ये आनंदाचं वातावरण आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रीदी याचं कमबॅक झालंय. श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघ जाहीर करण्यात आलाय. शाहीनची श्रीलंका विरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. पाकिस्तान या टेस्ट सीरिजच्या माध्यमातून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 मोहिमेला सुरुवात करणार आहे. शाहीनची टीममध्ये दुखापतीनंतर एन्ट्री झालीय.
शाहीनला गेल्या वर्षी गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे शाहीनला डोमेस्टिक सिजनमध्येही खेळता आलं नव्हतं. मात्र शाहीनने लाहोर कलंदर्सला आपल्या कॅप्टन्सीत पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत विजयी केलं होतं.
श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम
बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर/उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, हसन अली, इमाम-उल-हक, मोहम्मद हुरेरा, मोहम्मद नवाज, नसीम शाह, नोमान अली, सलमान अली आगा , सरफराज अहमद (विकेटकीपर), सऊद शकील, शाहीन अफरीदी आणि शान मसूद.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला कसोटी सामना, 12-16 जुलै
दुसरा कसोटी सामना, 20-24 जुलै
दरम्यान पाकिस्तान गेल्या वर्षी अर्थात 2022 मध्येही श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. तेव्हा उभयसंघात 1 सराव सामना आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. सराव सामना हा 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान पार पडला होता. हा सराव सामना अनिर्णित राहिला होता.
तर त्यानंतर 16 जुलैपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली. या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर 4 विकेट्सने विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर 246 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. अशा प्रकारे ही 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली होती. त्यामुळे यावेळेस कोण बाजी मारतं याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.