Cricket : टीम इंडियाचा पाकिस्तानकडून ‘हा’ विक्रम ‘कॉपी पेस्ट’, 2000 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी!

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातही कसोटी मालिका सुरू आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी एकच विक्रम रचले आहेत.

Cricket : टीम इंडियाचा पाकिस्तानकडून 'हा' विक्रम 'कॉपी पेस्ट', 2000 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी!
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 12:12 AM

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला आहे. तर दुसरा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये 438 धावा केल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडिज 255 धावांवर ऑल आऊट झाली होती. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने रौद्र रूप धारण केलेलं पाहायला मिळालं.

पाकिस्तानकडून कोणता विक्रम ‘कॉपी पेस्ट’

टीम इंडियाच्या फलंदाजांनी 181-2 धावा करत डाव घोषित केला होता. या धावा टी-20 स्टाईल पद्धतीने केलेल्या कारण अवघ्या 76 बॉलमध्ये 100 धावा इंडियन संघाने करत इतिहास रचला होता. त्यानंतर आता हाच विक्रम कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाने केला आहे. मात्र पाकिस्तान संघाला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी 100 बॉलचा सामना करावा लागला.

श्रीलंकेचा संघ पहिल्यांदा फलंदाजीला उतरला होता मात्र त्यांना अवघ्या 166 धावा करता आल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाने 16.4 ओव्हरमध्ये 100 धावा करत हा विक्रम केला. याआधी 2000 साली पाकिस्तानने 100 धावा लवकर पूर्ण केल्या होत्या.

टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरूद्ध सोमवारी हा विक्रम आपल्या नावावर केला. त्याच दिवशी पाकिस्तान संघानेही 100 बॉलमध्ये ही कामगिरी करून दाखवली. याआधी श्रीलंका संघाच्या नावावर हा विक्रम होता, त्यांनी 80 बॉलमध्ये बांगलादेशविरूद्ध सर्वात वेगाने आणि कमी चेंडूत 100 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम टीम इंडियाच्या नावावर झाला आहे.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): निशान मदुष्का, दिमुथ करुणारत्ने (C), कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा (W), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद, बाबर आझम (C), सौद शकील, सर्फराज अहमद (W), आगा सलमान, नोमान अली, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.