PAK vs BAN: बाबर आझमला सरावादरम्यान दुखापत! पहिल्या सामन्याला मुकणार?

| Updated on: Aug 17, 2024 | 12:04 AM

Pakistan vs Bangladesh: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. बांगलादेश या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या मालिकेआधी बाबर आझमला बॉल लागल्याने त्याला तीव्र वेदना झाल्या आहेत.

PAK vs BAN: बाबर आझमला सरावादरम्यान दुखापत! पहिल्या सामन्याला मुकणार?
babar azam pakistan
Follow us on

पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम बांगलादेश विरूद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कसून सराव करत आहेत. पाकिस्तानसाठी ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप साखळीच्या हिशोबाने फार महत्त्वाची आहे. मायदेशात मालिका होत असल्याने बाबर आझमच्या कामगिरीकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे. अशात बाबर सराव सत्रात दुखापतग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावला. बाबर आझम बॅटिंगचा सराव करत होता. या दरम्यान बॉल बाबरच्या अंगावर येऊन लागला. त्यामुळे बाबरला काही वेळ वेदना झाल्या. एका व्हीडिओत बाबरला नेट्स प्रॅक्टिसमध्ये अंगावर बॉल लागल्याने ग्रोईन इंजरी झाल्याचं दिसत आहे. बाबरला या दुखापतीमुळे फार त्रास झाला. मात्र बाबर या प्रकारानंतर पूर्णपणे फीट आहे की त्याला दुखापत झाली आहे? याबाबत कोणतीही माहिती नाही.

दरम्यान शान मसूद हा या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर सऊद शकील याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर नजमूल हुसैन शांतो याच्याकडे बांगलादेश क्रिकेटची धुरा असणार आहे. बांगलादेशला अद्याप पाकिस्तान विरुद्ध एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आता नजमूल हुसैन शांतोसमोर बांगलादेशला पाकिस्तान विरुद्ध पहिला विजय मिळवून देण्याचं आव्हान असणार आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 21 ते 25 ऑगस्ट, रावळपिंडी

दुसरा सामना, 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, कराची

बाबर आझमला नेट्समध्ये दुखापत

 

कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम : शान मसूद (कॅप्टन), सऊद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आजम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), नसीम शाह, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर) आणि शाहीन शाह अफरीदी.

कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), महमूदुल हसन जॉय, जाकिर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्कीन अहमद, सयद खालिद अहमद, नाहिद राणा, शोरफुल इस्लाम आणि हसन महमूद.