PAK vs NEP Prediction : आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामना, कोणते खेळाडू ठरणार बेस्ट आणि पिच रिपोर्ट जाणून घ्या

Asia Cup 2023, PAK vs NEP : आशिया कप 2023 स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचं पारडं जड आहे. पण काही खेळाडू आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेणार आहेत.

PAK vs NEP Prediction : आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामना, कोणते खेळाडू ठरणार बेस्ट आणि पिच रिपोर्ट जाणून घ्या
PAK vs NEP Prediction : आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हे खेळाडू करतील कमाल! जाणून घ्या पिच रिपोर्टImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 4:52 PM

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका अशा दोन देशात आयोजित करण्यात आली आहे. 4 सामने पाकिस्तानात, तर 8 सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले आहेत. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ या संघात होणार आहे. बलाढ्य पाकिस्तानसमोर नेपाळ संघाचं काहीच खरं याबाबत अधीच भाकीत वर्तवलं जात आहे. पण लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या नेपाळ संघाला कमी समजून चालणार नाही. कारण कोणत्याही क्षणी सामन्याचं पारडं पालटण्याची ताकद या संघात आहे. नेपाळ संघ पहिल्यांदाच आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. नेपाळ विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना लाहोरमधील गदाफी स्टेडियममध्ये होणार आहे.

पाकिस्तान मजबूत स्थितीत

पाकिस्तान मजबूत स्थितीत असून नुकतंच अफगाणिस्तानला 3-0 ने पराभूत केलं आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्येही पाकिस्तान अव्वल स्थानी आहे. आशिया कपच्या तिसऱ्या टायटलसाठी पाकिस्तान प्रयत्नशील असणार आहे. सामना होम ग्राउंडवर असल्याने पाकिस्तानला निश्चितच फायदा होणार आहे. तर नेपाळची या सामन्यात चांगलीच कसोटी लागणार आहे. आशिया कप स्पर्धेत भारताने 7 वेळा, श्रीलंकेने 6 वेळा आणि पाकिस्तानने 2 वेळा जेतेपद जिंकलं आहे.

पिच रिपोर्ट

पाकिस्तानातील मुल्तान क्रिकेट स्टेडियम फलंदाजीसाठी पुरक आहे. त्यामुळे या मैदानात धावांचा वर्षाव होईल. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली तर 300 च्या वर धावा होतील. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला जाईल. सामन्याच्या मध्यात फिरकीपटू सामना फिरवू शकतात.

हे खेळाडू ठरतील बेस्ट

पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा वरचष्मा असला तरी नेपाळचे काही खेळाडू आश्वासक कामगिरी करू शकतात. त्यामुळे आकड्यांचं गणित बिघडू शकतं. चला जाणून घेऊयात बेस्ट इलेव्हन कशी असेल ती..

इमाम उल हक (कर्णधार), बाबर आझम (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, शादाब खान, दिपेंद्र सिंह ऐरी, मोहम्मद नवाजस कुशल मल्ला, शाहीन आफ्रिदी, संदीप लमिछाने, हरिस रौफ

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान : फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद,सलमान अली आघा, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ

नेपाळ : आरिफ शेख, बी शर्की, के भुर्तेल, रोहित कुमार पौडेल (कर्णधार), दिपेंद्र सिंह ऐरी, कुशल मल्ला, अर्जुन सौद (विकेटकीपर), गुलशन कुमार झा, ललित राजभांशी, संदीप लामिछाने, के महातो.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.