World Cup 2023 : ‘त्या’ कृतीसाठी पाकिस्तानी पत्रकार जैनब अब्बास हीची भारतातून हकालपट्टी, काय केलं होतं ते जाणून घ्या
World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेला आता रंग चढू लागला आहे. पहिल्या टप्प्यात कही खूशी कही गम असं चित्र आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यात आणखी रंगतदार सामने पाहायला मिळणार यात शंका नाही. त्यात आता एका पाकिस्तानी पत्रकाराची हकालपट्टी केल्याची बातमी समोर आली आहे.
मुंबई : भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु असून दहा संघ सहभागी झाले आहेत. यात सर्वच देशांचे पत्रकार सामन्यांचं कव्हरेज करण्यासाठी भारतात आले आहेत. यात आयसीसी वर्ल्डकप होस्ट करण्यासाठी पाकिस्तानची महिला पत्रकार जैनब अब्बास ही भारतात आली होती. अँकरिंगसाठी ती आली होती. पण आता तिची भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे.पाकिस्तान पत्रकार जैनब अब्बास सध्या दुबईत असल्याची माहिती मिळत आहे. हिंदू देवी देवतांचा अपमान केल्याप्रकरणी हे पाऊल उचललं गेलं आहे. भारतीय वकील विनीत जिंदल यांच्या तक्रारीनंतर हे पाऊल उचललं गेलं आहे. ही तक्रार काही वर्षांपूर्वी केलेल्या ट्विट प्रकरणी आहे. यात हिंदू देवी आणि देवतांबाबत आक्षेपार्ह लिहण्यात आलं आहे.
तक्रारदार वकिलांनी तक्रारीत म्हंटलं आहे की, “हे ट्वीट 9 वर्षांपूर्वी युजर नेम “Zainablovesrk” वरून करण्यात आलं होतं. आता त्याचं नाव बदलून “ZAbbas Official” असं करण्यात आलं आहे.” पाकिस्तानी पत्रकार जैनब अब्बास हीच्या विरोधात दिल्लीच्या सायबर सेलकडे ही तक्रार दाखल करण्यात आली होती. हिंदू देवी देवतांचा अपमान केल्याप्रकरणी आयपीसी कलम 153ए, 295, 506 आणि 121 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. तसेच वर्ल्डकप स्पर्धेतील प्रेजेन्टर लिस्टमधून बाहेर काढण्यास सांगितलं होतं.
Update on Zainab Abbas Matter:- Big Win as @ZAbbasOfficial Pakistani presenter reportedly deported after complaint filed by Advocate & Social Activist @vineetJindal19 with Delhi Police & Ministry of Home Affairs and BCCI. Thanks to All authorities @HMOIndia @BCCI for taking… https://t.co/9HmKkWV3w7
— Adv.Vineet Jindal (@vineetJindal19) October 9, 2023
2 ऑक्टोबरला जैनब अब्बास हीने ट्वीट करत लिहिलं होतं की, “दुसरीकडे काय आहे याची कायम उत्सुकता होती. मतभेदापेक्षा कल्चरची समानता, मैदानावर प्रतिस्पर्धी पण मैदानाबाहेर दोस्ती. एकच भाषा आणि आर्टसाठी प्रेम आणि कोट्यवधी लोकांचा देश, इथे प्रतिनिधित्व, कंटेट बनवणे आणि कामासाठी बेस्ट लोकांसोबत जाण्याासाठी..क्रिकेट वर्ल्डकप 2023 साठी आयसीसी पुन्हा एकदा भारतात असण्यासाठी नम्र आहे. घरापासून 6 आठवड्यांचा प्रवास आता सुरु होत आहे.”
There was always intrigue on what lies on the other side, more cultural similarities than differences, rivals on the field but camaraderie off the field, the same language & love for art & a country with a billion people, here to represent, to create content & bring in expertise… pic.twitter.com/dvoRUASpmm
— zainab abbas (@ZAbbasOfficial) October 2, 2023
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला सामना होणार आहे. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडला 81 धावांनी पराभूत केलं. तर भारताने ऑस्ट्रेलियाला 6 गडी राखून पराभूत केलं आहे. भारताचा पुढचा सामना 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानशी होणार आहे. तर पाकिस्तान 10 ऑक्टोबरला श्रीलंकेशी भिडणार आहे.