Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान प्रशिक्षकाची जागा घेणार पार्थिव पटेल! बॅटिंग कोच म्हणून होणार नियुक्ती

पाकिस्तान क्रिकेट व्हाईट बॉल क्रिकेटचा हेड कोच गॅरी कर्स्टन मागच्या पर्वात गुजरात टायटन्स फलंदाज प्रशिक्षक होता. तसेच मार्गदर्शकाच्या भूमिकेत होता. आता त्याची जागा पार्थिव पटेल घेण्याची शक्यता आहे. गॅरी कर्स्टनने याच वर्षी गुजरात टायटन्सची साथ सोडून पाकिस्तानचा हात हातात घेतला आहे.

पाकिस्तान प्रशिक्षकाची जागा घेणार पार्थिव पटेल! बॅटिंग कोच म्हणून होणार नियुक्ती
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 7:02 PM

आयपीएल 2025 लिलावापूर्वी फ्रेंचायझींमध्ये उलथापालथ सुरु आहे. कोचिंग स्टाफमध्ये बदल करण्यासाठी फ्रेंचायझींमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. काही फ्रेंचायझींनी हेड कोच म्हणून नव्या व्यक्तींची निवड केली आहे. असं असताना आणखी एक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा माजी विकेटकीपर फलंदाज पार्थिव पटेल पाकिस्तानचा व्हॉईट बॉल हेड कोच गॅरी कर्स्टन याची जागा घेणार आहे. गॅरी कर्स्टन मागच्या पर्वात गुजरात टायटन्सचा फलंदाज प्रशिक्षक आणि मेंटॉर होता. मात्र गुजरात टायटन्स सोडून पाकिस्तान क्रिकेट संघाचा व्हाइट बॉल संघाचा मुख्य प्रशिक्षकपदी रूजू होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली असून गॅरी कर्स्टनच्या जागी पार्थिव पटेल गुजरात टायटन्समध्ये जागा घेऊ शकतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, गुजरात टायटन्स पार्थिव पटेलला मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत आहे. पार्थिव पटेल गुजरात टायटन्सचा बॅटिंग मेंटॉर होऊ शकतो.

माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफमध्ये सहभागी होऊ शकतो. गॅरी कर्स्टन आयपीएलमध्ये 2022 पासून गुजरात टायटन्सचा भाग होता. 2022 मध्ये गुजरात टायटन्सने जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर 2023 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. 2024 आयपीएलमध्ये गुजरातची स्थिती ढासळली. त्यानंतर गॅरी कर्स्टनने गुजरातची साथ सोडली आणि पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त झाला. दुसरीकडे, पार्थिव आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी 25 कसोटी, 38 वनडे आणि 2 टी20 सामने खेळला आहे. तसेच 2020 पर्यंत आयपीएलमध्ये एक खेळाडू खेळाला आहे. 2008 ते 2010 पर्यंत चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला होता. त्यानंतर कोच्चि टस्कर्स केरळ, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला आहे.

पार्थिव पटेलचं गुजरातशी खास कनेक्शन आहे. पार्थिव पटेलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2016-2017 मध्ये रणजी ट्रॉफीत मुंबईला पराभूत करून पहिल्यांदा गुजरातला किताब मिळवून दिला होता. पार्थिव पटेल टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळला आहे. पार्थिव पटेलने 2002 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. भारतासाठी कसोटी खेळणारा सर्वात तरूण विकेटकीपर आहे.पार्थिवने डिसेंबर 2020 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.