IPL 2023 | आयपीएलआधी टीमला मजबूत फटका, एका झटक्यात महागडा खेळाडू ‘आऊट’
टी 20 क्रिकेटचा महासंग्राम अर्थात आयपीएल स्पर्धेच्या 16 पर्वाला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. फक्त काही दिवस सुरु असताना स्टार खेळाडूला या स्पर्धेत खेळता येणार नाहीये.
मुंबई |आयपीएल स्पर्धेच्या 16 व्या मोसमाची सर्वांनाच उत्सुकता लागलीय. एकूण 10 संघ या हंगामाच्याआधी जोरदार तयारीला लागलेत. सर्व खेळाडू हे कसून सराव करत आहेत. आता या पर्वाला मोजून 7 दिवस राहिले आहेत. यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र अवघ्या काही दिवसांवर स्पर्धा आली असताना एका टीमला मोठा झटका बसला आहे. टीमने ज्या खेळाडूसाठी कोट्यवधी रुपये मोजले, तोच खेळाडू हा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलं आहे.
नक्की कारण काय?
या खेळाडूला ना हरकत प्रमाणपत्र मिळालं नाही. यामुळे या क्रिकेटरला आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. कोणत्याही देशाच्या खेळाडूला देशाबाहेरील क्रिकेट स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल, तर त्याला आपल्या क्रिकेट बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी घ्यावी लागते. या पत्रानंतरच खेळाडूला सहभागी होता येतं.
कोण आहे तो खेळाडू?
इंग्लंडचा आक्रमक बॅट्समन जॉनी बेयरस्टो हा पायाच्या दुखापतीतून सावरतोय. आतापर्यंत जॉनीची दुखापत ही डोकेदुखी ठरत होती. मात्र आता त्यापुढे जाऊन एनओसीचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे एनओसी न मिळाल्याने जाहीर आहे की जॉनीला या आयपीएल 2023 मध्ये खेळता येणार नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या एनओसी न देण्याच्या निर्णयामुळे पंजाब किंग्स टीमला मोठा धक्का बसला आहे.
मात्र दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा ऑलराउंडर लियाम लिविंगस्टोन याला परवानगी मिळाली आहे. लिविंगस्टोन याचं गुडघ्याच्या दुखापतीनंतर कमबॅक झालं आहे.
क्रिकेट बोर्डाला फायदा काय?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आपल्या खेळाडूंना परदेशात होणाऱ्या लीगमध्ये खेळायची परवानगी देण्यात क्रिकेट बोर्डाचा फायदा काय? या खेळाडूंना मिळणाऱ्या एकूण रक्कमेच्या 10 टक्के हे बोर्डाला द्यावे लागतात. उदाहरण म्हणजे एका खेळाडूला आयपीएलमधील टीमने 1 कोटी रुपय मोजून आपल्या ताफ्यात घेतलंय. तर त्या खेळाडूला आपल्या क्रिकेट बोर्डाला 10 टक्क्यांनुसार 10 लाख रुपये द्यावे लागतील. पंजाब किंग्सने बेयरस्टोला ऑक्शनमधून 6 कोटी 75 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेतलंय.
आयपीएल 2023 पंजाब किंग्स टीम
शिखर धवन (कॅप्टन), शाहरुख खान, जॉनी बेयरस्टो, प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषि धवन, लियम लिविंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंह, बलतेज सिंह, नाथन एलिस, कगिसो रबाडा, राहुल चाहर, हरप्रीत बराड़, सॅम करन, सिकंदर रजा, हरप्रीत सिंह भाटिया, विध्वत कवेरप्पा, मोहित राठी आणि शिवम सिंह.