…तर पंजाब किंग्स IPL 2022 चा चॅम्पियन बनेल, कप्तान मयंक अग्रवालचा सहकाऱ्यांना कानमंत्र
इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) स्पर्धेत यंदा काही संघांची कमान नव्या कर्णधारांच्या हाती सोपवण्यात आली आहे. पंजाब किंग्ज (Punjab Kings) देखील यापैकी एक आहे. भारतीय संघाचा स्टार सलामीवीर मयंक अग्रवालला संघाचा कर्णधार (PBKS Captain Mayank Agarwal) बनवण्यात आले आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) स्पर्धेत यंदा काही संघांची कमान नव्या कर्णधारांच्या हाती सोपवण्यात आली आहे. पंजाब किंग्ज (Punjab Kings) देखील यापैकी एक आहे. भारतीय संघाचा स्टार सलामीवीर मयंक अग्रवालला संघाचा कर्णधार (PBKS Captain Mayank Agarwal) बनवण्यात आले आहे. गेल्या मोसमापर्यंत मयंक संघाचा उपकर्णधार होता. केएल राहुलने संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही जबाबदारी मयंकला मिळाली आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या महा लिलावात केवळ नवा कर्णधारच नाही, तर फ्रँचायझीनेही शानदार तयारी केली होती. साहजिकच संघाला याबद्दल खूप आत्मविश्वास आहे. कर्णधार मयंकलाही आपल्या संघाकडून खूप अपेक्षा आहेत. पंजाब किंग्जकडे पहिल्यांदाच आयपीएलचे जेतेपद पटकावू शकेल असा मजबूत आणि सक्षम संघ आहे, असा विश्वास नव्या कर्णधाराने व्यक्त केला.
गेल्या 14 हंगामात अनेकवेळा दिग्गज खेळाडू असूनही पंजाब किंग्जच्या संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. हा संघ केवळ एकदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर गेल्या काही वर्षांत तो प्लेऑफपर्यंत पोहोचू शकलेला नाही. अशा स्थितीत नवा कर्णधार, नवे खेळाडू आणि नव्या अपेक्षांसह पंजाब किंग्ज अधिक दमदार पद्धतीने स्पर्धेत उतरणार आहे.
दबावाखाली चांगले खेळलो तर जेतेपद आमचंच
मयंक अग्रवाल आयपीएलमध्ये पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करणार आहे आणि पहिल्याच सत्रात त्याच्याकडे खरोखरच चांगली टीम आहे. यामुळे मयंक देखील उत्साही आणि आत्मविश्वासाने भरलेला दिसत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने मयंकच्या हवाल्याने म्हटले आहे की, “आमच्याकडे विजेतेपदासाठी पात्र असा मजबूत संघ आहे. आता खेळाडूंना दबावाखाली आपली क्षमता दाखवावी लागणार आहे. एक संघ म्हणून आम्ही लिलावात चांगली कामगिरी केली. ही स्पर्धा मुंबईत होणार हे आम्हाला माहीत होते, त्यामुळे त्याआधारेच संघ निवडण्यात आला आहे. आमच्याकडे संतुलित संघ आहे याचा आम्हाला आनंद आहे.”
लिलावात पंजाबची जबरदस्त कामगिरी
पंजाब किंग्जने गेल्या महिन्यात झालेल्या लिलावात शिखर धवनच्या रूपाने एक दिग्गज आणि अनुभवी सलामीवीर विकत घेतला. त्याच वेळी, लियाम लिव्हिंगस्टन, जॉनी बेअरस्टो, शाहरुख खान, ओडिन स्मिथ यांसारखे काही स्फोटक फलंदाज विकत घेतले. त्याच वेळी, संघाने दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यालादेखील संघात स्थान दिलं आहे. तर युवा भारतीय लेग-स्पिनर राहुल चाहर देखील पंजाबसाठी खेळणार आहे.
#CaptainPunjab middling everything ?#SaddaPunjab #TATAIPL2022 #PunjabKings @mayankcricket pic.twitter.com/wMriPaDLtW
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 19, 2022
इतर बातम्या
Women’s World Cup 2022: पूजा वस्त्राकरचा 81 मीटरचा षटकार, ठरला वर्ल्डकपमधला सर्वात लांब सिक्सर
IPL 2022 मध्ये चांगली कामगिरी करुन टीम इंडियात स्थान मिळवणार; स्पर्धेआधी शिखर धवनचा निर्धार