PBKS vs DC IPL 2021 Match 29 | धवनची अर्धशतकी ‘गब्बर’ खेळी, पंजाबवर 7 विकेट्सने शानदार विजय, पॉइंट्स टेबलमध्ये गाठलं ‘शिखर’
PBKS vs DC Live Score Marathi | दिल्ली कॅपिट्ल्सने पंजाब किंग्सवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे.
अहमदाबाद | दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) पंजाब किंग्सवर (Punjab Kings) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला विजयासाठी 167 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लीने 17.4 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक 69 धावांची नाबाद खेळी केली. तसेच पृथ्वी शॉने 39 धावा केल्या. तसेच स्टीव्ह स्मिथने 24 धावांची खेळी केली. या सामन्याचे आयोजन अहमदाबादमधील (narendra modi stadium) नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले होते. (pbks vs dc live score ipl 2021 match punjab kings vs delhi capitals scorecard online narendra modi stadium ahmedabad in marathi)
LIVE Cricket Score & Updates
-
दिल्लीचा विजय षटकार
दिल्ली कॅपिट्ल्सने पंजाब किंग्सवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. पंजाबने विजयासाठी दिलेले 167 धावांचे आव्हान दिल्लीने 17.4 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. यासह दिल्लीने विजयी षटकार लगावला आहे. तसेच दिल्लीने पॉइंट्स टेबलमध्ये 12 गुणांसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
The gloves were off tonight as we conquered the #NorthernDerby in #IPL2021 ?#YehHaiNayiDilli #PBKSvDC pic.twitter.com/2idtciUADq
— Delhi Capitals (Stay Home. Wear Double Masks?) (@DelhiCapitals) May 2, 2021
-
दिल्लीला तिसरा झटका
दिल्लीने तिसरी विकेट गमावली आहे. कर्णधार रिषभ पंत आऊट झाला आहे. पंतने 14 धावांची खेळी केली. -
-
दिल्लीला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 23 धावांची आवश्यकता
दिल्लीला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. शिखर धवन 64* आणि रिषभ पंत 14* धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
रिषभ पंतचा फॅल्ट सिक्स
रिषभ पंतने 15 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर फॅल्ट सिक्स लगावला.
-
शिखर धवनचे अर्धशतक
शिखर धवनने शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. शिखरने अवघ्या 35 चेंडूत 4 चौकार आणि 2 सिक्ससह अर्धशतक झळकावलं. शिखरचं या मोसमातील हे तिसरं अर्धशतक ठरलं.
Mr Consistent = @SDhawan25
The Orange Cap is back with the @DelhiCapitals opener and he now brings up his 3rd 50 in #IPL2021. This time in 35 balls with 4×4, 2×6. https://t.co/Rm0jfZKXXT #PBKSvDC #VIVOIPL pic.twitter.com/noZaSlRvFv
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
-
दिल्लीला दुसरा झटका
दिल्लीने दुसरी विकेट गमावली आहे. स्टीव्ह स्मिथ कॅच आऊट झाला आहे. स्टीव्हने 22 चेंडूत 24 धावा केल्या.
-
दिल्लीला विजयासाठी 61 धावांची आवश्यकता
दिल्लीला विजयासाठी 48 चेंडूत 61 धावांची आवश्यकता आहे. दिल्लीने 12 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 106 धावा केल्या आहेत.
-
गब्बरचा जब्बर सिक्स
‘गब्बर’ शिखर धवनने 12 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर गुडघ्यावर बसून 80 मीटर लांबीचा सिक्स लगावला आहे.
-
दिल्लीचा 8 ओव्हरनंतर स्कोअर
दिल्लीने 8 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 74 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ 9 आणि शिखर धवन 24 धावांवर नाबाद आहे.
-
दिल्लीला पहिला झटका
शानदार सुरुवातीनंतर दिल्लीला पहिला झटका बसला आहे. फिरकीपटू हरप्रीत ब्रारने 7 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर पृथ्वी शॉचा त्रिफळा उडवला. पृथ्वीने 39 धावांची खेळी केली.
Match 29. 6.1: WICKET! P Shaw (39) is out, b Harpreet Brar, 64/1 https://t.co/Rm0jfZtn6l #PBKSvDC #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
दिल्लीचा पावर प्लेनंतर स्कोअर
दिल्लीने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 63 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉ 39* आणि शिखर धवन 22* धावांवर नाबाद खेळत आहे. दिल्लीला विजयासाठी 84 चेंडूत आणखी 104 धावांची आवश्यकता आहे.
It has been eventful Powerplay where Prithvi first got hit and then he began hitting. #DC are 63-0 with Prithvi on 39(21) and Shikhar on 22(15). https://t.co/Rm0jfZKXXT #PBKSvDC #VIVOIPL #IPL2021 pic.twitter.com/rVsUWnxRTz
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
पृथ्वी शॉ-शिखर धवन सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी
दिल्लीची शानदार सुरुवात झाली आहे. पृथ्वी शॉ-शिखर धवन सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.
Yet another 50-run stand for our opening pair ?
DC – 58/0 (5.4) #YehHaiNayiDilli #IPL2021 #PBKSvDC
— Delhi Capitals (Stay Home. Wear Double Masks?) (@DelhiCapitals) May 2, 2021
-
दिल्लीची जबरदस्त सुरुवात
दिल्लीची शानदार सुरुवात झाली आहे. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या सलामी जोडीने पहिल्या 5 ओव्हरमध्ये 46 धावा केल्या आहेत. पृथ्वी 26* आणि शिखर18* धावांवर नाबाद आहेत.
-
पृथ्वी शॉ चा टॉप गिअर
पृथ्वी शॉने दुसऱ्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली आहे. पृथ्वीने सलग 2 चौकार लगावले. त्यानंतर पृथ्वीने सिक्स लगावला.
DC चा 2 ओव्हरनंतर स्कोअर
DC 24-0
पृथ्वी शॉ | 16* (8)शिखर धवन | 7*(4) -
दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 167 धावांचे आव्हान
दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. पृथ्वी शॉ-शिखर धवन सलामी जोडी मैदानात खेळत आहे. दिल्लीला विजयासाठी 167 धावांची आवश्यकता आहे. -
दिल्लीला विजयासाठी 167 धावांचे आव्हान
पंजाब किंग्सने (Punjab Kings) दिल्ली कॅपिट्ल्सला (Delhi Capitals) विजयासाठी 167 धावांचे आव्हान दिले आहे. पंजाबने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावून 166 धावा केल्या आहे. पंजाबकडून कर्णधार मयंक अग्रवालने सर्वाधिक नाबाद 99 धावा केल्या. तसेच डेव्हिड मलानने 26 धावांची खेळी केली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
Innings Break: A spectacular knock from @mayankcricket (99 from 58) guides @PunjabKingsIPL to 166/6. #DC had kept it tight until the final over, which fetched 23 runs.https://t.co/Rm0jfZKXXT #PBKSvDC #VIVOIPL #IPL2021 pic.twitter.com/cnCNNn5Vd2
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
पंजाबला सहावा झटका
पंजाबला सहावा झटका बसला आहे. ख्रिस जॉर्डन 2 धावा करुन तंबूत परतला.
-
पंजाबला पाचवा धक्का
पंजाबला पाचवा धक्का बसला आहे. शाहरुख खान आऊट झाला आहे. शाहरुखने 4 धावा केल्या.
-
पंजाबचा 17 ओव्हरनंतर स्कोअर
पंजाब किंग्सने 17 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 128 धावा केल्या आहेत. कर्णधार मयंक अग्रवाल 71 आणि शाहरुख खान 4 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
मयंक अग्रवालचे अर्धशतक
पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अग्रवालने संयमी अर्धशतक झळकावलं आहे. विशेष म्हणजे मयंकने चौकार ठोकत हे अर्धशतक पूर्ण केलं.
Fifty with a four! ??
Captain Mayank, keep going ?#SaddaPunjab #PunjabKings #IPL2021 #PBKSvDC
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 2, 2021
-
पंजाबची चौथी विकेट
पंजाबने चौथी विकेट गमावली आहे. दीपक हुड्डा चोरटी धाव घेण्याच्या नादात रन आऊट झाला. हुड्डा 1 धावा करुन माघारी परतला.
-
पंजाबला तिसरा झटका
पंजाबने तिसरी विकेट गमावली आहे. फिरकीपटू अक्षर पटेलने डेव्हिड मलानला बोल्ड केलं. मलानने 26 धावा केल्या.
-
पंजाबचा 10 ओव्हरनंतर स्कोअर
पंजाबने 10 ओव्हरनंतर 2 विकेट्स गमावून 63 धावा केल्या आहेत. डेव्हिड मलान 10* आणि मयंक अग्रवाल 27* धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
पुण्यात उद्याही लसीकरण बंद राहणार
पुणे : शहरात उद्याही लसीअभावी 45 वर्षावरील व्यक्तीचं लसीकरण राहणार बंद आजही शहराला राज्य सरकारकडून लसीचा पुरवठा नाहीच दोन दिवसापासून लसीकरण होतं बंद उद्याही लसीकरण बंद राहणार महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती
-
पंजाबचा पावर प्लेनंतर स्कोअर
पंजाबने पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 39 धावा केल्या आहेत. डेव्हिड मलान आणि कर्णधार मयंक अग्रवाल मैदानात खेळत आहेत. पंजाबने पावर प्लेमध्ये प्रभासिमरन सिंह आणि ख्रिस गेल या महत्वाच्या फलंदाजांची विकेट गमावली.
-
पंजाबला मोठा झटका
पंजाबला मोठा झटका लागला आहे. आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आऊट झाला आहे. कगिसो रबाडाने गेलचा त्रिफळा उडवला. गेलने 13 धावा केल्या.
-
पंजाबला पहिला झटका
पंजाबला पहिला झटका लागला आहे. प्रभासिमरन सिंह आऊट झाला आहे. प्रभासिमरन 12 धावा केल्या.
Match 29. 3.3: WICKET! P Singh (12) is out, c Steve Smith b Kagiso Rabada, 17/1 https://t.co/Rm0jfZtn6l #PBKSvDC #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
दिल्लीची मेडन ओव्हरने शानदार सुरुवात
पंजाब विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. दिल्लीने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडले आहे. दिल्लीकडून सामन्यातील पहिली ओव्हर इशांत शर्माने टाकली. इशांतने ही मेडन ओव्हर टाकत दिल्लीला चांगली सुरुवात मिळवून दिली.
-
दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन
रिषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कगिसो रबाडा आणि आवेश खान
Match 29. Delhi Capitals XI: P Shaw, S Dhawan, S Smith, R Pant, M Stoinis, S Hetmyer, A Patel, L Yadav, K Rabada, I Sharma, A Khan https://t.co/Rm0jfZtn6l #PBKSvDC #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
पंजाब किंग्सची प्लेइंग इलेव्हन
मयंक अग्रवाल (कर्णधार), प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), ख्रिस गेल, डेव्हीड मलान, दीपक हुड्डा, शाहरूख खान, ख्रिस जॉर्डन, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई आणि रायली मेरेडिथ.
Match 29. Punjab Kings XI: M Agarwal, P Singh, C Gayle, D Malan, D Hooda, S Khan, H Brar, C Jordan, R Meredith, R Bishnoi, M Shami https://t.co/Rm0jfZtn6l #PBKSvDC #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
दिल्लीने टॉस जिंकला
दिल्ली कॅपिट्लस्ने टॉस जिंकला आहे. कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी आमंत्रित केले आहे.
Toss Update: In Match 29 of #VIVOIPL, @DelhiCapitals captain @RishabhPant17 opts to bowl first after winning the toss. @mayankcricket is leading @PunjabKingsIPL. https://t.co/Rm0jfZKXXT #PBKSvDC #VIVOIPL #IPL2021 pic.twitter.com/ipOkmrZpXe
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
-
पंजाब विरुद्ध दिल्ली आमनेसामने
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 29 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
Published On - May 02,2021 11:08 PM