PBKS vs GT IPL 2023 Highlights | गुजरात टायटन्सचा अखेरच्या ओव्हरमध्ये विजय, पंजाबवर 6 विकेट्सने मात

| Updated on: Apr 14, 2023 | 12:40 AM

PBKS vs GT IPL 2023 Highlights In Marathi | गुजरात टायट्न्सने पंजाब किंग्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. गुजरातची ही चेसिंग करण्याची ही 7 वी वेळ होती. गुजरातने या 7 पैकी सहाव्यांदा यशस्वीपणे हे आव्हान पूर्ण केलं.

PBKS vs GT IPL 2023 Highlights | गुजरात टायटन्सचा अखेरच्या ओव्हरमध्ये विजय, पंजाबवर 6 विकेट्सने मात

मोहाली | गुजरात टायटन्स टीम पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आली आहे. गुजरातने पंजाब किंग्सवर त्यांच्यात घरात 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. राहुल तेवतिया याने शेवटच्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर चौकार ठोकत गुजरातचा विजय नक्की केला. पंजाबने विजयासाठी दिलेलं 154 धावांचं आव्हान हे गुजरातने 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. गुजरातकडून शुबमन गिल याने 67 धावांची खेळी केली. शुबमनचं या मोसमातील हे दुसरं अर्धशतक ठरलं. गुजरातने आतापर्यंत एकूण 7 सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना सहावा विजय मिळवला आहे. तर गुजरातचा हा या मोसमातील तिसरा विजय तर पंजाबचा दुसरा पराभव ठरला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Apr 2023 11:25 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score | रंगतदार सामन्यात गुजरातचा विजय

    गुजरात टायटन्सने अखेरच्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने विजयासाठी दिलेलं 154 धावांचं आव्हान 1 बॉल राखत 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. राहुल तेवतिया याने चौकार मारत गुजरातला हा विजय मिळवून दिला.

  • 13 Apr 2023 10:35 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score | साई सुदर्शन 19 धावांवर आऊट

    गुजरात टायटन्सने दुसरी विकेट गमावली आहे. साई सुदर्शन 19 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 13 Apr 2023 10:06 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score | ऋद्धीमान साहा आऊट

    गुजरात टायटन्से पहिली विकेट गमावली आहे.  ऋद्धीमान साहा 30 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 13 Apr 2023 09:45 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score | गुजरातच्या बॅटिंगला सुरुवात

    गुजरातच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. पंजाबने गुजरातला विजयासाठी 154 धावांचं आव्हान दिलं आहे.

  • 13 Apr 2023 09:41 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score | गुजरातला 154 धावांचं आव्हान

    पंजाब किंग्सने गुजरात जायंट्सला विजयासाठी 154 धावांचं आव्हान दिलं आहे.  पंजाबने 20 ओव्हरमध्ये  8 विकेट्स गमावून 153 धावा केल्या. पंजाबकडून सलामी जोडीचा अपवाद वगळता मीडल ऑर्डरमधील सर्व फलंदाजांना अपेक्षित आणि चांगली सुरुवात मिळाली. मात्र यापैकी एकालाही टॉप गिअर टाकत फटकेबाजी करण्यात अपयश आलं. पंजाबकडून मॅथ्यू शॉट याने सर्वाधिक 36 धावा केल्या.  जितेश शर्मा याने 25  रन्स केल्या. सॅम करन आणि शाहरुख खान या दोघांनी प्रत्येकी 22 धावांची खेळी केली. तर भानुका राजपक्षा याने 20 रन्स केल्या.  गुजरातकडून मोहित शर्मा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर राशिद खान, अल्जारी जोसेफ, जोशवा लिटील आणि मोहम्मद शमी या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

  • 13 Apr 2023 09:19 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score | सॅम करन आऊट

    पंजाब किंग्सने सहावी विकेट गमावली आहे. सॅम करन आऊट झाला आहे.

  • 13 Apr 2023 08:11 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score | मॅथ्यू शॉर्ट आऊट

    पंजाब किंग्सने तिसरी विकेट गमावली आहे. राशिद खान याने मॅथ्यू शॉर्ट याला 36 धावांवर आऊट केलंय.

  • 13 Apr 2023 07:51 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score | पंजाब किंग्सला मोठा झटका

    पंजाब किंग्सला मोठा झटका लागला आहे. कॅप्टन शिखर धवन आऊट झाला आहे. अल्जारी जोसेफ याने उलट धावत धवनची सुपर कॅच घेतली.

  • 13 Apr 2023 07:50 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score |  गुजरात टायटन्स टीमचा कर्णधार बदलला

    गुजरात टायटन्स टीमचा कर्णधार बदलला, जाणून घ्या कारण

    बातमीची लिंक | गुजरात टायटन्स टीमने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात कर्णधार बदलला

  • 13 Apr 2023 07:33 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score | पंजाब किंग्सची खराब सुरुवात, पहिला धक्का

    पंजाब किंग्सला पहिल्याच ओव्हरमधील दुसर्या बॉलवर झटका बसला आहे. प्रभासिमरन सिंह भोपळा न फोडता आऊट झाला आहे.  मोहम्मद शमी याने आपल्या गोलंदाजीवर राशिद खान याच्या हाती प्रभासिमरन याला कॅच आऊट केलं.

  • 13 Apr 2023 07:14 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score | गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन

    हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.

  • 13 Apr 2023 07:12 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score | पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन

    शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, ऋषी धवन आणि अर्शदीप सिंग.

  • 13 Apr 2023 07:03 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score | नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने

    गुजरात टायन्सने टॉस जिंकला आहे. गुजरातने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पंजाब गुजरातसमोर किती धावांचं आव्हान ठेवतं याकडे लक्ष असेल.

  • 13 Apr 2023 06:34 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score | आकडेवारी काय सांगते?

    आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 2 वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी म्हणजेच पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स या दोघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे.

  • 13 Apr 2023 06:30 PM (IST)

    पुण्यात युवक काँग्रेसच अनोखं आंदोलन

    वेताळ टेकडी वाचवण्यासाठी युवक काँग्रेसचे तरुण तरुणी रस्त्यावर

    विठ्ठल टेकडी आपल्याला आवाज देतेय म्हणून युवक काँग्रेसचे गुडलक चौक येथे आंदोलन

    पुण्यातील वेताळ टेकडीवर होणाऱ्या प्रकल्पावरून सध्या राजकारण सुरू असताना युवक काँग्रेस करत आहे आंदोलन

    झाडांना फाशी देत अनोखं आंदोलन

  • 13 Apr 2023 06:13 PM (IST)

    PBKS vs GT IPL 2023 Live Score | पंजाब विरुद्ध गुजरात यांच्यात कडवी झुंज

    पंजाब आणि गुजरात हे या मोसमातील दोन्ही तुल्यबळ संघ भिडणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेल्या 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या लढतीत कोण मैदान मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

Published On - Apr 13,2023 6:08 PM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.