PBKS vs RCB IPL 2023 Highlight | विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीला सूर गवसला, पंजाबवर मिळवला 24 धावांनी विजय

| Updated on: Apr 20, 2023 | 7:11 PM

PBKS vs RCB IPL 2023 Highlight | आयपीएल 2023 स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीला सूर गवसला आहे. पंजाबला पराभूत केल्याने स्पर्धेतील चुरस आणखी वाढली आहे.

PBKS vs RCB IPL 2023 Highlight | विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीला सूर गवसला, पंजाबवर मिळवला 24 धावांनी विजय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स सामना, कोण मारणार बाजी?

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील 27 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगला. हा सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 24 धावांनी जिंकला. या विजयासाठी आरसीबीच्या खात्यात 2 गुणांची भर पडली असून सहा गुण झाले आहेत. त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 गडी गमवून 20 षटकात 174 धावा केल्या. विजयासाठी 175 धावांचं आव्हान पंजाब किंग्स समोर होतं. पण पंजाबचा संघ 18.2 षटकात सर्वबाद 150 धावा करू शकला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 20 Apr 2023 07:09 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | आरसीबीची जोरदार कमबॅक, पंजाबवर 24 धावांनी विजय

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 गडी गमवून 20 षटकात 174 धावा केल्या. विजयासाठी 175 धावांचं आव्हान पंजाब किंग्स समोर होतं. पण पंजाबचा संघ 18.2 षटकात सर्वबाद 150 धावा करू शकला.

  • 20 Apr 2023 07:02 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | विराट कोहलीची नेतृत्वाची जादू चालली, पंजाब विरुद्ध विजय मिळवत गाडी रुळावर

    आरसीबीने पंजाबवर 24 धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. आरसीबीच्या विजयानंतर सहा संघांमध्ये जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे.

  • 20 Apr 2023 06:31 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | शाहरुख खान बाद झाल्याने पंजाब संघ संकटात

  • 20 Apr 2023 06:23 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | प्रभसिमरन 46 धावांवर तंबूत

  • 20 Apr 2023 06:14 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | सॅम करन बाद झाल्याने पंजाबचा संघ दबावात

  • 20 Apr 2023 05:49 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | पंजाबचा सुरुवातीचा डाव अडखळला

    बंगळुरुने दिलेल्या विजयी धावांचा पाठलाग करताना पंजाबचा डाव सुरुवातीलाच अडखळला. आघाडीचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. अथर्व तायडेच्या रुपाने पहिला धक्का बसला. अवघ्या 4 धावांवर असताना मोहम्मद सिराजने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या मॅट शॉर्टला वनिंदू हसरंगाने त्रिफळाचीत केलं. तो 8 या धावसंख्येवर असताना बाद झाला. त्यानंतर लायम लिविंगस्टोनही काही खास करू शकला नाही. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर 2 धावा असताना बाद झाला. त्यानंतर हरमनप्रीत भाटीया धावचीत झाला. त्यामुळे संघावरील दडपण वाढलं.

  • 20 Apr 2023 05:45 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | लायम लिविंगस्टोन 2 धावा करून पायचीत

    पंजाब किंग्सला लायम लिविंगस्टोनच्या रुपाने तिसरा धक्का बसला आहे.

  • 20 Apr 2023 05:38 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | पंजाबला दुसरा धक्का

  • 20 Apr 2023 05:31 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | पंजाब किंग्सला पहिला धक्का

  • 20 Apr 2023 05:11 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | बंगळुरुच्या 4 बाद 174 धावा, विजयासाठी 175 धावांचं आव्हान

    मुंबई : आयपीएलचा 27 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात बंगळुरुने 20 षटकात 4 गडी गमवून 174 धावा केल्या. पंजाब किंग्सला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं आहे. विराट आणि फाफने चांगली सुरुवात करून दिली, पण संघासाठी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विराट कोहलीने 59, तर फाफने 84 धावांची खेळी केली.

  • 20 Apr 2023 05:09 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा डाव

    विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 137 धावांची भागीदारी केली. विराट कोहली 47 चेंडूत 59 धावा करून बाद झाला. यात 5 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला ग्लेन मॅक्सवेल आपलं खातंही खोलू शकला नाही. फाफ डू प्लेसिसने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र नाथन एलिसच्या गोलंदाजीवर 84 धावांवर बाद झाला. दिनेश कार्तिकही काही विशेष करू शकला नाही त्याने 5 चेंडू 7 धावा केल्या.

    हरप्रीत ब्रारनं दोन तर अर्शदीप सिंह आणि नाथन एलिसने प्रत्येकी एक गडी बाद केला.

  • 20 Apr 2023 05:04 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | दिनेश कार्तिक बाद

  • 20 Apr 2023 04:58 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | फाफ डू प्लेसिस 84 धावांवर बाद

  • 20 Apr 2023 04:50 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | ग्लेन मॅक्सवेल शून्यावर बाद

  • 20 Apr 2023 04:49 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | विराट कोहली 59 धावा करून बाद

  • 20 Apr 2023 04:34 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | विराट कोहलीची अर्धशतकी खेळी

  • 20 Apr 2023 04:21 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | विराट आणि फाफची शतकी भागीदारी

  • 20 Apr 2023 04:15 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | फाफ डू प्लेसिसचं अर्धशतक

  • 20 Apr 2023 03:56 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | विराट फाफची पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी

  • 20 Apr 2023 03:52 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | विराट आणि फाफची पॉवरप्लेमध्ये आक्रमक खेळी

    विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने पंजाबविरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळीने सुरुवात केली.

  • 20 Apr 2023 03:09 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | आरसीबीची प्लेइंग इलेव्हन

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज

  • 20 Apr 2023 03:09 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | पंजाब किंग्सची प्लेइंग इलेव्हन

    पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग

  • 20 Apr 2023 03:05 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | विराट कोहलीकडे कर्णधारपद का?

    फाफ डु प्लेसिसला बरं वाटत नसल्याने तो आज इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार आहे. फलंदाजी करेल पण क्षेत्ररक्षण करणार नाही.

  • 20 Apr 2023 03:04 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला, बॉलिंगचा निर्णय

    पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर धवन या सामन्यातही खेळणार नाही.

  • 20 Apr 2023 03:01 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | विराट कोहलीकडे आरसीबीचं नेतृत्व

    विराट कोहलीकडे आरसीबीचं कर्णधारपद

  • 20 Apr 2023 01:17 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | मोहालीची खेळपट्टी कशी आहे?

    मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या मैदानावर मोठी धावसंख्या करता येईल. पण गोलंदाजांचा चांगलाच कस लागणार आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर दोन्ही संघ प्रथम गोलंदाजी करण्यावर भर देतील. कारण विजयी लक्ष्याचा पाठलाग करणं संघांना आवडेल.

  • 20 Apr 2023 12:59 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | अशी असेल आरसीबीची संभावित प्लेइंग इलेव्हन

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची संभावित प्लेइंग-11 (पहिली फलंदाजी घेतली तर..): फॉफ-डू-प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानेंदु हसरंगा, हर्षल पटेल, वायने पार्नेल, मोहम्मद सिराज.

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची संभावित प्लेइंग-11 (पहिली गोलंदाजी घेतली तर..): फाफ-डू-प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानेंदु हसरंगा, हर्षल पटेल, वायने पार्नेल, विजय कुमार विशाक, मोहम्मद सिराज.

    RCB इम्पॅक्ट प्लेयर्स: सुयश प्रुभदेसाई/विजय कुमार विशाक

  • 20 Apr 2023 12:57 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | अशी असेल पंजाब किंग्सची संभावित प्लेइंग इलेव्हन

    पंजाब किंग्सची संभावित प्लेइंग-11 (फलंदाजी घेतली तर): शिखर धवन (कर्णधार) प्रभसिमरन सिंह, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंह, सिकंदर रजा, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत बरार, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंह.

    पंजाब किंग्सची संभावित प्लेइंग-11 (गोलंदाजी घेतली तर): पंजाब किंग्स की संभावित प्लेइंग-11 (पहले बल्लेबाजी): शिखर धवन मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंह, सिकंदर रजा, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत बरार, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंह, राहुल चाहर.

    PBKS इम्पॅक्ट प्लेयर्स: प्रभसिमरन सिंह/राहुल चाहर

  • 20 Apr 2023 12:53 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ

    पंजाबचा पूर्ण : शिखर धवन, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंह, अथर्व तायडे, हरप्रीत बरार, लियम लिविंगस्टन, राज अंगद बावा, मॅथ्यू शॉर्ट, ऋषि धवन, शाहरुख खान, अर्शदीप सिंह, बलतेज सिंह, कागिसो रबाडा, नाथन एलिस, राहुल चाहर, सैम कर्रन, सिकंदर रजा, हरप्रीत भाटिया, विद्धवत, मोहित राठी, शिवम सिंह.

  • 20 Apr 2023 12:53 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संपूर्ण संघ

    बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.

  • 20 Apr 2023 12:52 PM (IST)

    PBKS vs RCB IPL 2023 Live Score | हेड टू हेड मध्ये कोण वरचढ?

    पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या आतापर्यंत 30 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 17 सामन्यात पंजाबने, तर 13 सामन्यात आरसीबीने विजय मिळवला आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार पंजाबचा संघ वरचढ दिसून येत आहे.

Published On - Apr 20,2023 12:51 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.