IPL 2023 PBKS vs RCB : विराट कोहलीचा आयपीएलच्या सहाव्या सामन्यात नवा विक्रम, काय केलं ते वाचा
RCB vs PBKS IPL 2023 : आयपीएल 2023 स्पर्धेत विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विराट कोहली 15 महिन्यानंतर आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवित आहे.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची स्थिती चांगली नसली तरी विराट कोहली चांगलाच फॉर्मात आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे.पंजाब विरुद्धच्या सामन्यात 47 चेंडूत 59 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. या दरम्यान विराट कोहलीने फाफ डू प्लेसिससोबत शतकी भागीदारी देखील केली. इतकंच काय तर या स्पर्धेतील चौथं अर्धशतक झळकावलं आहे. विराट कोहलीने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये 36 वं अर्धशतक झळकावलं. त्याचबरोबर खेळाडू 48 वं अर्धशतकं, तर या हंगामातील हे 4 अर्धशतक आहे.
विराट कोहली मागच्या सिझनमध्ये पूर्णपणे फेल ठरला होता. धावांसाठी त्याचा संघर्ष क्रीडाप्रेमींनी चिंता व्यक्त केली होती. पण आता पुन्हा एकदा तो जुन्या फॉर्मात परतला आहे. सहा सामन्यात चौथ अर्धशतक झळकावत कोहलीने कर्णधार म्हणून 6500 धावांचा पल्ला गाठला आहे.
☑️ 36th Fifty as RCB Captain ☑️ 48th Fifty in IPL☑️ 4th Fifty this season
Captain Kohli ?#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #PBKSvRCB @imVkohli pic.twitter.com/VTbZRRRtLZ
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 20, 2023
विराट कोहली आयपीएल इतिहासात 100 डावात 30 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये 600 चौकार मारणारा कोहली तिसरा खेळाडू आहे. त्याच्या नावावर आता 229 सामन्यात 603 चौकार आहेत. दुसरीकडे विराट कोहलीने आयपीएलमध्ये 229 षटकारही मारले आहेत.या व्यतिरिक्त फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली जोडीने आयपीएल 2023 सर्वाधिक धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारे पाच खेळाडू
- शिखर धवन- 730 चौकार, 209 सामने
- डेविड वॉर्नर- 608 चौकार, 167 सामने
- विराट कोहली- 603 चौकार, 221 सामने
- रोहित शर्मा- 535 चौकार, 227 सामने
- सुरेश रैना- 506 चौकार, 200 सामने
विराट कोहली शतकी भागीदारी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना ख्रिस गेल आणि विराट कोहलीच्या नावावर शतकी भागीदारीचा रेकॉर्ड आहे. दोघांनी 4 वेळा शतकी भागीदारी केली आहे. विराट आणि फाफने तीन वेळा शतकी भागीदारी, विराट आणि देवदत्त पड्डिकलने दोन वेळा शतकी भागीदारी केली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग