Sanju Samson : पंजाबच्या घरात राजस्थानचा ‘हल्ला बोल’, कॅप्टन संजू समॅनसचा कीर्तिमान, शेन वॉर्नचा रेकॉर्ड ब्रेक
Punjab Kings vs Rajasthan Royals : संजू सॅमसन याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला 50 धावांनी पराभवाची धुळ चारली. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने या विजयासह महारेकॉर्ड केला आहे.

पंजाब किंग्सला घरच्या मैदानात पराभूत व्हावं लागलं आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 18 वा सामना हा पंजाबच्या घरच्या मैदानातील अर्थात महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. राजस्थानने या सामन्यात पंजाबवर 50 धावांनी मात केली. राजस्थानचा हा या मोसमातील सलग दुसरा विजय ठरला. तर पंजाबला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानच्या या विजयासह कर्णधार संजू सॅमसन याने महारेकॉर्ड केला आहे. संजूने राजस्थान रॉयल्सचा दिग्गज कर्णधार शेन वॉर्न याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. संजू राजस्थान रॉयल्सचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.
संजूने शेन वॉर्नला पछाडलं
संजूच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सचा हा 32 वा विजय ठरला. संजूने यासह राजस्थ रॉयल्सचा सर्वात यशस्वी कर्णधार होण्याचा बहुमान मिळवला. याआधी राजस्थानला कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकून देण्याचा विक्रम हा शेन वॉर्न याच्या नावावर होता. वॉर्नने राजस्थानला 31 सामन्यात विजय मिळवून दिला. तर संजूने 62 सामन्यांमध्ये नेतृत्व करत असताना 32 वा विजय मिळवून दिला. तर वॉर्नने 55 सामन्यांतून राजस्थानला 31 सामने जिंकून दिले होते. तर राजस्थानच्या यशस्वी कर्णधारांच्या नेतृत्वात राहुल द्रविड तिसऱ्या स्थानी आहे. द्रविडने राजस्थानला 18 सामन्यांत विजय मिळवून देण्यात यश मिळवलं होतं.
सामन्याचा धावता आढावा
राजस्थान रॉयल्सने यशस्वी जयस्वाल याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 205 धावा केल्या. यशस्वीने 45 बॉलमध्ये 67 रन्स केल्या. मात्र पंजाबला विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना 9 विकेट्स गमावून 155 धावाच करता आल्या.
संजूचा महारेकॉर्ड
🚨 HISTORY BY SANJU SAMSON 🚨
– Sanju has the most wins as a Rajasthan Royals Captain in IPL History 👑 pic.twitter.com/IzIdGyVKNO
— Johns. (@CricCrazyJohns) April 5, 2025
पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, युद्धवीर सिंग चरक आणि संदीप शर्मा.