‘श्श्श! खेळपट्ट्यांबद्दल काही बोलायचं नाही’; PCB अध्यक्ष रमीझ राजांची समालोचकांना तंबी
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कराचीमध्ये (Karachi Test) खेळवला जात आहे. उभय संघांमध्ये खेळवल्या जात असलेल्या या मालिकेत खेळाच्या चर्चेपेक्षा खेळपट्टीनेच जास्त भाव खाल्लाय.
इस्लामाबाद : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कराचीमध्ये (Karachi Test) खेळवला जात आहे. उभय संघांमध्ये खेळवल्या जात असलेल्या या मालिकेत खेळाच्या चर्चेपेक्षा खेळपट्टीनेच जास्त भाव खाल्लाय. रावळपिंडीनंतर आता कराचीच्या खेळपट्टीचा मूडही क्रिकेटपंडितांना खटकतोय. रावळपिंडी कसोटीनंतर खेळपट्टीवरून पाकिस्तानला जगभरातून फटकारले जात आहे. अनेक प्रश्न उपस्थित केले गेले, ज्यांचे उत्तर देणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कठीण झाले. आता कराचीच्या खेळपट्टीचा मूडही लोकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनत चालला आहे, अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) अॅक्शनमध्ये आले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रमीझ राजा यांनी कराची टेस्टमधील कॉमेंट्री पॅनलला खेळपट्टीबद्दल बोलू नका असे सांगितले आहे. खेळपट्टी कशी आहे या बद्दल न बोलण्याची तंबी दिली आहे. आता कसोटी सामना सुरू आहे आणि खेळपट्टीची चर्चाच होणार नाही तर खेळ पाहायला मजा कशी येईल. पण, आपल्या चुका, फसलेली स्ट्रॅटेजी हे सगळं लपवण्यासाठी पीसीबीने समालोचकांना खेळपट्टीबाबत काहीही बोलू नये, अशी तंबी दिली आहे.
रमीझ राजांकडून खेळपट्टीबद्दल बोलण्यास बंदी!
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा यांनी खेळपट्टीबद्दल बोलण्यास मनाई करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी कराचीच्या कॉमेंट्री बॉक्समधील समालोचकांना खेळपट्टीबद्दल बोलण्यास मनाई केली. त्याआधी त्यांनी रावळपिंडीतही असाच फतवा काढला होता, असा दावा जिओ न्यूजच्या पत्रकाराने केला आहे.
रावळपिंडीची खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी योग्य नव्हती. याची सर्व जगाला कल्पना आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. या खेळपट्टीवर आयसीसीने कारवाईदेखील केली आहे.
रावळपिंडीनंतर कराचीच्या खेळपट्टीबाबतही प्रश्न!
रावळपिंडीच्या चुकीनंतर पाकिस्तान धडा घेईल आणि कराचीमध्ये चांगली खेळपट्टी तयार करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. त्यानंतर उभय संघांमध्ये एक चांगली लढत होईल असा विचार करुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कराचीत चांगली खेळपट्टी बनवेल, असं अनेकांना वाटत होतं मात्र पाकिस्तान बोर्डाने पुन्हा आपल्या चुकीची पुनरावृत्ती केली आहे. कराचीच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने 9 बाद 556 धावा करून पहिला डाव घोषित केला.
इतर बातम्या
ICC WWC 2022: न्यूझीलंडला मोठ्या फरकाने हरवून ऑस्ट्रेलियाची विजयी हॅट्ट्रिक
IND W vs WI W: मिताली राज, स्मृती मानधना जबाबदारी कधी घेणार? कोच रमेश पोवार म्हणाले…