Icc World Cup 2023 साठी पाकिस्तानची टीम जाहीर, स्टार बॉलर दुखापतीमुळे बाहेर
Pakistan World Cup Squad For Icc World Cup 2023 : स्टार बॉलर नसीम शाह दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडलाय. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा झटका आहे. नसीम याच्या जागी हसन अली याला संधी देण्यात आली आहे.
इस्लामाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पीसीबी (Pakistan World Cup Squad 2023)निवड समिती अध्यक्ष इंझमाम उल हक यांनी पाकिस्तान टीम जाहीर केली आहे. इंझमाम यांनी पत्रकार परिषद घेत खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. वर्ल्ड कपसाठी एकूण 15 जणांना संधी देण्यात आली आहे. पाकिस्तान संघाल मोठा फटक बसला असून त्यांचा स्टार बॉलर बाहेर पडला आहे. पाकिस्तान संघाचा हुकमी एक्का बाहेर झाल्याने संघासाठी वाईट बामती आहे.
बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर शादाब खान उपकर्णधारपद सांभाळणार आहे. तसेच स्टार बॉलर नसीम शाह दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडलाय. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा झटका आहे. नसीम याच्या जागी हसन अली याला संधी देण्यात आली आहे.
दरम्यान वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत 7 टीम जाहीर झाल्या आहेत. पाकिस्तान वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर करणारी आठवी टीम ठरली आहे. आतापर्यंत टीम इंडिया, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानने वर्ल्ड कपसाठी क्रिकेट टीमची घोषणा केली आहे. तर आता श्रीलंका आणि बांगलादेशने अजून टीम जाहीर केलेली नाही. वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर करण्याची 28 सप्टेंबर अखेरची तारीख आहे.
दरम्यान, नसीमला आशिया कप 2023 दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे पीसीबीला वर्ल्ड कप टीम जाहीर करण्याआधी नसीम शाह याची दुखापतीतून बरे होण्याची प्रतिक्षा होती. जेणेकरुन नसीमची वर्ल्ड कपसाठी निवड करता येईल. मात्र नसीमला दुखापतीतून सावरण्यासाठी किमान 5-6 आठवड्यांचा वेळ लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, सौद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, हसन अली , उसामा मीर, आणि मोहम्मद वसीम जूनियर.