IND vs ENG : टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दुसरा विजय, इंग्लंडवर 29 धावांनी मात
PD T20 Champions Trophy 2025 : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत पाकिस्ताननंतर इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करत सलग दुसरा विजय मिळवला आहे.
टी 20i चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. टीम इंडियाने विक्रांत केणी याच्या नेतृत्वात या स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने 13 जानेवारी रोजी एफटीझेड क्रिकेट ग्राउंड, कटुनायके येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडवर 29 धावांनी मात केली. शतकवीर राजेश कन्नूर हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. विक्रांत केणी याच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा विजय मिळवला. टीम इंडिया या स्पर्धेतील तिसरा सामना हा श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना बुधवारी 15 जानेवारीला पार पडणार आहे.
टीम इंडियाची बॅटिंग
टीम इंडियाकडून राजेश कन्नूर याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. राजेशने 65 चेंडूत 119 धावांची खेळी केली. तर रवींद्र संते याने विस्फोटक खेळी करत शानदार फिनिशींग टच दिला. संतेने 24 बॉलमध्ये 45 धावा केल्या. राजेशने केलेली शतकी खेळी आणि संतेने दिलेला फिनीशिंग टच यामुळे टीम इंडियाला 20 षटकांमध्ये 190 पार मजल मारता आली. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 191 धावा केल्या.
इंग्लंडची बॅटिंग
दरम्यान इंग्लंडला 192 धावांचा पाठलाग करताना 162 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडसाठी विल फ्लिन याने सर्वाधिक धावा केल्या. विलने 41 बॉलमध्ये 87 रन्स केल्या. विलच्या या खेळीत 8 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या दुसऱ्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखलं. विलला दुसऱ्या बाजूने साथ न मिळाली नाही. त्यामुळे इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 162 धावाच करता आल्या. टीम इंडियाकडून रवींद्र संते याने 24 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेत विजयात निर्णायक भूमिका बजावली.
भारताचा सलग दुसरा विजय
Victory for Team India! 🏏🔥
India secures a thrilling 29-run win, showcasing grit, determination, and impeccable teamwork! 🇮🇳💪 Another step closer to glory—let’s celebrate this fantastic performance! 🎉🌟
@jayshah220988 @icc @indiancricketteam pic.twitter.com/HUmEZk32P7
— Differently Abled Cricket Council of India (@dcciofficial) January 13, 2025
दरम्यान टीम इंडिया 15 जानेवारी रोजी विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. टीम इंडियाचा तिसरा सामना हा यजमान श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. आता टीम इंडियाच्या तिसऱ्या सामन्याच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.