जसप्रीत बुमराहसाठी काय पण! डोळे झाकून सही करण्यास विराट कोहलीची तयारी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर पाच दिवस उलटले तरी उत्साह काही कमी झालेला नाही. टीम इंडिया मायदेशात परताच चाहत्यांचा तसाच जोश दिसून आला. यामुळे क्रिकेटपटूही भावूक झाले. वानखेडेवरील विजयोत्सवात स्टार फलंदाज विराट कोहलीने भावना व्यक्त केल्या. यावेळी त्याने बुमराहचं कौतुक केलं.

जसप्रीत बुमराहसाठी काय पण! डोळे झाकून सही करण्यास विराट कोहलीची तयारी
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 10:42 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची सांघिक कामगिरी दिसून आली. साखळी फेरी ते अंतिम फेरीपर्यंत विजयी घोडदौड कायम राहिली आहे. कॅनडा विरुद्धचा सामना काय तो फक्त पावसामुळे रद्द झाला. या व्यतिरिक्त टीम इंडियाने पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेसारख्या दिग्गज संघांना पराभवाचं पाणी पाजलं. या स्पर्धेतील काही सामना हातातून जाण्यासारखे होते. मात्र टीम इंडियाने कमबॅक करत सामन्यात विजय मिळवून दिला. पाकिस्तान विरूद्धच्या हायव्होल्टेज सामन्यातही असंच झालं होतं. फक्त 119 धावांचं आव्हान असताना टीम इंडियाने हा सामना 6 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यातही नाजूक स्थिती होती. मात्र गोलंदाजांनी कमाल केली आणि हा सामना 24 धावांनी जिंकला. अंतिम सामन्यात चित्र काही वेगळं नव्हतं. टी20 क्रिकेटमध्ये 30 चेंडूत 30 धावा म्हणजे सहज होणारं टार्गेट होतं. पण तरीही टीम इंडियाने कमबॅक केलं आणि हा सामना 7 धावांनी जिंकला. या विजयाची आकडेमोड केल्यानंतर विराट कोहली जसप्रीत बुमराहचं कौतुक करण्यास मागे पडला नाही. डोळे झाकून सही करण्याची तयारी देखील दाखवली.

विराट कोहली म्हणाला की, “मला अशा व्यक्तीचे कौतुक करावे लागेल, ज्याने आम्हाला खेळात परत आणले. पुन्हा, पुन्हा, पुन्हा जिंकवलं. मी सर्वांना सांगेन की “बुमराह” साठी टाळ्या झाल्या पाहीजेत.” विराट कोहलीने बुमराहचं कौतुक करताना पुढे सांगितलं की, बुमराहसारखा गोलंदाज क्वचितच एक जनरेशनमध्ये दिसतो. आम्ही खूप नशिबवान आहोत की तो आमच्यासोबत खेळत आहे. यावेळी अँकरिंग करणाऱ्या गौरव कपूरने विराट कोहलीला विचारलं की, मी विचार करत करत आहे की जसप्रीत बुमराहला राष्ट्रीय संपत्ती जाहीर करावं? तू सही करणार का? गौरवने असा प्रश्न विचारताच विराट कोहलीने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं की, मी आता सही करायला तयार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील चमकदार कागमरीसाठी जसप्रीत बुमराहला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. जसप्रीत बुमराहने 8 सामन्यात 4.17 च्या इकोनॉमी रेटने 15 गडी बाद केले होते. मोक्याच्या क्षणी विकेट घेऊन टीम इंडियाला विजयाच्या वाटेवर आणलं होतं. त्यामुळे जसप्रीत बुमराहचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने आपल्या निवृत्तिबाबतही जाहीरपणे भाष् केलं. “माझी निवृत्ती अजून खूप लांब आहे. मी आता कुठे खेळायला सुरु केलं आहे.”

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.