IPL 2022, CSK vs GT, Purple Cap : गुजरातचा चेन्नईवर 3 गडी राखून विजय, पर्पल कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?
गुजरातला सीएसकेनं 170 धावांचे लक्ष्य दिलं होतं. ते गुजरातनं पूर्ण करत तीन गडी राखून विजय मिळवलाय. डेव्हिड मिलरनं या सामन्यात अर्धतक पूर्ण केलं. यानंतर पर्पल कॅपच्या यादीत काही बदल झाले आहेत का, पाहुया
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील काल झालेल्या गुजराट टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) सामन्यात राशिद खान, मिलरने जोरदार फटकेबाजी केली. विशेष म्हणजे राशिदने चार बॉलमध्ये तीन षटकार आणि एक चौकार सलग मारला. राशिदने 17व्या ओवरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. तर मिलरने देखील धो-धो धुतलं. या सामन्यात गुजरातला सीएसकेनं 170 धावांचे लक्ष्य दिलं होतं. ते गुजरातनं पूर्ण करत तीन गडी राखून विजय मिळवलाय. या सामन्यात डेव्हिड मिलरनं या सामन्यात अर्धतक पूर्ण केलं. ब्राव्होच्या बॉलवर मोईनने त्याला आऊट केलं. राशिदने 21 बॉलमध्ये 40 धावा काढल्या. त्यात तीन षटकार आणि एक चौकार मारला. गुजरातने सहज आपलं लक्ष्य पार केलं आणि तीन गडी राखून गुजरात टायटन्स विजयी झालाय. यानंतर पर्पल कॅपच्या यादीत काही बदल झाले आहेत का, पाहुया
पर्पल कॅपचा मानकरी कोण?
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने आयपीएलच्या या पंधराव्या सीजनमध्ये एकूण 12 विकेट घेतल्या आहे. त्यानंतर क्रमांक लागतो तो नटराजनचा त्यानेही बारा विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कुलदीप यादव आहे. कुलदीपने 11 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आवेश खान आहे. त्यानेही 11 विकेट घेतल्या आहेत. पाचव्या स्थानी वानिंदू आहे. त्यानेही 11 विकेट घेतल्या आहेत.
पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज
गोलंदाज | विकेट | दिलेल्या धावा |
---|---|---|
युझवेंद्र चहल | 26 | 462 |
वानिंदू हसरंगा | 24 | 362 |
कागिसो रबाडा | 23 | 406 |
उमरान मलिक | 22 | 444 |
कुलदीप यादव | 21 | 419 |
कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
कालच्या सामन्यातील विक्रम
चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले. आयपीएलच्या या सीजनमध्ये ऋतुराज गायकवाडने फक्त 35 धावा केल्या आहेत. कालही ऋतुराज फ्लॉप ठरला. पण सीएसकेने त्यांचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर आज ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढून भल्याभल्याना शांत केलंय.ऋतुराजने अर्धशतकही पूर्ण केलंय.
राशिदची चर्चा
राशिद खानने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिदने 17व्या ओवरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. त्यानंतर ब्राव्होच्या बॉलवर मोईनने त्याला आऊट केलं. राशिदने 21 बॉलमध्ये 40 धावा काढल्या. त्यात तीन षटकार आणि एक चौकार मारला.
इतर बातम्या
Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर, पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर