मुंबई : लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super Giants) गुरुवारी पहिल्या विजयाची नोंद केली. इविन लुईस (Evin Lewis) आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) लखनौच्या विजयाचे हिरो ठरले. पण त्याची पायाभरणी केएल राहुल आणि क्विंटन डि कॉकच्या जोडीने केली. नाणेफेक जिंकून केएल राहुलने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. रॉबिन उथाप्पा, मोईन अलीने ज्या पद्धतीने सुरुवात केली, ते पहाता केएल राहुलचा निर्णय चुकला असंच वाटलं. चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 210 धावांचा डोंगर उभारला. लखनौ सुपर जायंट्सला हे लक्ष्य पार कठीण जाईल असं वाटलं होतं. पण लखनौने शेवटच्या षटकापर्यंत खेचल्या गेलेल्या या सामन्यात आरामात विजयी लक्ष्य गाठलं. आता असं असताना दोन्ही संघाच्या फलंदाजांनी षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडूनही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत एकाही फलंदाजाला फाक डू प्लेसिसचा पराभव करता आला नाही. मात्र, या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा रॉबिन उथप्पा आणि लखनऊचा युवा स्टार आयुष बडोनी या शर्यतीत सहभागी झालाय.आता प्रत्येक सामन्यासोबत ही शर्यत अधिकच रंजक होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघाच्या फलंदाजांनी षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडूनही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत एकाही फलंदाजाला फाक डू प्लेसिसचा पराभव करता आला नाही. पहिल्यांदाच यंदाच्या सीजनमधली ऑरेंज कॅप देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डु प्लेसीला ही कॅप मिळाली आहे. केकेआर विरुद्धच्या सामन्यात डु प्लेसी फ्लॉप ठरला. पण पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातील कामगिरीमुळे तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला.
फलंदाज | धावा |
---|---|
जोस बटलर | 718 |
केएल राहुल | 537 |
डी कॉक | 502 |
शिखर धवन | 460 |
हार्दिक पांड्या | 453 |
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डु प्लेसीला ही कॅप मिळाली आहे. तर मागच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड सर्वाधिक धावा करुन ऑरेंज कॅप मिळवली होती. त्यावेळी ऋतुराजने CSK मधील आपला सहकारी फाफ डु प्लेसीपेक्षा दोन धावा जास्त करुन ही ऑरेंज कॅप मिळवली होती. फाफने 633 तर ऋतुराजने 635 धावा केल्या होत्या. सध्या चालू सीजनमध्ये फाफ डु प्लेसीने पंजाब किंग्स विरुद्ध सर्वाधिक 88 धावांची खेळी केली. दोन सामन्यात मिळून त्याने 93 धावा केल्या आहेत.
गोलंदाज | विकेट | दिलेल्या धावा |
---|---|---|
युझवेंद्र चहल | 26 | 462 |
वानिंदू हसरंगा | 24 | 362 |
कागिसो रबाडा | 23 | 406 |
उमरान मलिक | 22 | 444 |
कुलदीप यादव | 21 | 419 |
फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. कालपर्यंत दिल्ली कॅपिटल्सचा कुलदीप यादव आघाडीवर होता. पण कालच्या सामन्यानंतर यामध्ये बदल झाला आहे.
इतर बातम्या
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्याच्या लग्नाचा अल्बम; जिवलग मैत्रिणीशी बांधली लग्नगाठ
Gudhi padwa recipe : तोंडाला पाणी सुटणारी ‘ही’ थाळी करून पाहाच, Video viral