Video : पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर बांधून मैदानात उतरला खेळाडू, 14 सामन्यात ठोकल्या 621 धावा

क्रिकेट खेळाची क्रेझ सर्व स्तरातील लोकांमध्ये पाहायला मिळते. खेळाडूही जीवाची बाजी लावून मैदानात उतरतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर लावून खेळाडू मैदानात उतरला होता.

Video : पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर बांधून मैदानात उतरला खेळाडू, 14 सामन्यात ठोकल्या 621 धावा
थांबायचं नाही गड्या...! ऑक्सिजन सिलेंडर पाठिला बांधून गाजवलं मैदान, Watch Video
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 4:24 PM

मुंबई : प्रत्येक खेळामध्ये आपल्याला खेळाडूंचा जोश पाहायला मिळतो. स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक जण जीवाची बाजी लावतो, असं म्हणायला हरकत नाही. आत्मविश्वास दांडगा असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. असाच काहीसा प्रकार क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाला. 83 वर्षांचा खेळाडू पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर बांधून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. स्कॉटलँडमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवलेल्या माजी क्रिकेटपटू एलेक्स स्टील यांच्या हिमतीला दाद दिली जात आहे. त्यांनी 83 वय हा निव्वल आकडा असल्याचं आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. श्वास घेण्यास त्रास होत असूनही मैदानात उतरले.

83 वर्षीय एलेक्स स्टील पाठीवर सिलेंडर बांधून मैदानात उतरले. इतकंच काय तर त्यांनी विकेटकीपिंग केली. एलेक्स यांना इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस नावाचा आजार आहे. हा आजार श्वसनासंबंधी आहे. या आजारामुळे अचानक शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होते आणि श्वास घेण्यास अडचण येते. एलेक्स यांना 2020 पासून हा आजार आहे. पण इतकं असूनही ते क्रिकेट खेळण्यासाठी सदैव सज्ज असतात.

View this post on Instagram

A post shared by Cricketgraph (@cricketgraph)

क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करणं एक कठीण टास्क मानला जातो. विकेटच्या पाठी गोलंदाज टाकत असलेल्या प्रत्येक चेंडूवर नजर ठेवून कामगिरी बजवावी लागते. असं असूनही एलेक्स स्टील ही जबाबदारी चोखपणे बजावतात.

14 फर्स्ट क्लास सामन्यात 621 धावा केल्या

एलेक्स स्टील यांनी फर्स्ट क्लास डेब्यू 1967 साली केलं होतं. त्याने 14 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 24.48 च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह 621 धावा केल्याआहेत. विकेटकीपर फलंदाज म्हणून 1968 मध्ये आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात त्यांचा 97 धावा केल्या होत्या. इतकंच काय तर विकेटकीपिंग करताना एलेक्सने 11 झेल आणि 2 स्टंपिंग घेतले आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.