IPL 2022, Points Table : प्लेऑफची लढत रंजक, चेन्नई आणि मुंबई इंडियन्स बाद, तिसऱ्या स्थानासाठी 7 संघांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या पॉईंट्स टेबल

प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात पहिला संघ ठरला तर मुंबई इंडियन्स हा या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा संघ आधीच बाहेर होता आणि गुरुवारी या संघाने चेन्नई सुपर किंग्सचं कामही संपवलं.

IPL 2022, Points Table : प्लेऑफची लढत रंजक, चेन्नई आणि मुंबई इंडियन्स बाद, तिसऱ्या स्थानासाठी 7 संघांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या पॉईंट्स टेबल
चेन्नई आणि मुंबई इंडियन्स बादImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 6:58 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये काल 59 व्या सामन्यात पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सनं (MI) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 16 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 97 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 14.5 षटकांत 5 बाद 103 धावा करून सामना जिंकला. आयपीएलचा पंधरावा सीजन अखेरच्या टप्प्यात आला आहे. यासोबतच प्लेऑफची लढत देखील रोमांचक होतं आहे. आता ही शर्यत दहा संघांमध्ये नाही. गुजरात टायटन्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरल्यामुळे ही शर्यत आता फक्त सात संघामध्ये आहे. प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात पहिला संघ ठरला तर मुंबई इंडियन्स हा या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा संघ आधीच बाहेर होता आणि गुरुवारी या संघाने चेन्नई सुपर किंग्सचं कामही संपवलं. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर मंबई आणि चेन्नई आमनेसामने होते. या सामन्यात मुंबईनं विजय मिळवत चेन्नईला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढलं. या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये काय बदल झालाय ते पाहुया.

गुणपत्रिकेत कोणताही बदल नाही

मुंबईच्या या विजयाने चेन्नईच्या प्लेऑफमध्ये जाणऱ्या आशा भंगल्या आहेत. पण, यामुळे गुणतालिकेत कोणताही बदल झालेला नाही. मुंबईचा संघ अजूनही दहाव्या तर चेन्नईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. मुंबईचे 12 सामन्यांत 3 विजय आणि 9 पराभवांसह 6 गुण आहेत. त्याचवेळी चेन्नईचे 12 सामन्यांत 4 विजय आणि 8 पराभवांसह 8 गुण आहेत. गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याचा कर्णधार असलेला हा संघ 12 सामन्यांत 9 पराभव आणि 3 विजयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्स आहे. ज्यांच्या नावावर 16 गुण आहेत. राजस्थान 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स 12 गुणांसह पाचव्या, सनरायझर्स हैदराबाद 10 गुणांसह सहाव्या, कोलकाता नाईट रायडर्स दहा गुणांसह सातव्या आणि पंजाब किंग्स अकरा गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

प्लेऑफची लढत रोमांचक

आयपीएलचा पंधरावा सीजन अखेरच्या टप्प्यात आला आहे. यासोबतच प्लेऑफची लढत देखील रोमांचक होतं आहे. आता ही शर्यत दहा संघांमध्ये नाही. गुजरात टायटन्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरल्यामुळे ही शर्यत आता फक्त सात संघामध्ये आहे. प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात पहिला संघ ठरला तर मुंबई इंडियन्स हा या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरलाय.

हे सुद्धा वाचा

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.