मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांना शेवट्या दोन ठिकाणी रहावं लागेल असं दिसतंय. दोन्ही संघांना दहाव्या स्थानापासून निसटण्याची शेवटची आशा सनरायजर्स हैदराबाद होती, जो सलग पाच सामने गमावल्यानंतर आठव्या स्थानावर घसरली होता. पण हैदराबादने याउलट प्लेऑफच्या शर्यतीत आपली दावेदारी पुनरुज्जीवित करत अंतिम चारची शर्यत अधिक रोमांचक केली. मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायजर्सने मुंबई इंडियन्सचा तीन धावांच्या फार कमी फरकानं त्यांच्या घरच्या मैदानावरच पराभव करून पराभवाची साखळी तोडण्यात यश मिळविले. मात्र, तरीही संघ आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे अंतिम चारची शर्यत अधिक रोमांचक केली. आता क्रिकेटप्रेमींना देखील सामने पहायला मजा येतेय.
गेल्या पाच सामन्यांतील सलग पराभवांमुळे हैदराबाद दिल्ली, बंगळुरू, पंजाब आणि कोलकाता यांच्याविरुद्ध प्लेऑफच्या चर्चेत सतत मागे पडत होते. अशा परिस्थितीत संघाला शेवटचा जोर देण्याची गरज होती. अशा स्थितीत ‘करा किंवा मरा’ असा प्रसंग आला. तेव्हा केन विल्यमसनच्या संघाने प्रत्येक आघाडीवर चांगली कामगिरी केली. मात्र, त्याच्यासमोर मुंबई इंडियन्स होती. जी यंदाच्या मोसमात खराब कामगिरीमुळे आधीच बाद झाली होती. पण गेल्या काही सामन्यांमध्ये ती चांगली स्थितीत असल्याचे दिसत आहे.
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
तेरा सामन्यांत सहा विजय मिळवून हैदराबादचे आता बारा गुण झाले असून त्यांनी या बाबतीत पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सची बरोबरी केली आहे. असं असूनही हा संघ निव्वळ धावगतीच्या दरात खूप मगा पडला आहे. मुंबईचा विचार केल्यास रोहित शर्माच्या संघाचा तेरा सामन्यांमधला हा दहावा पराभव आहे. जी आयपीएलच्या इतिहासातील मुंबईची सर्वात खराब कामगिरी आहे. या पराभवानंतर त्यांनी दहा स्थानावर जाण्याची शक्यता जवळपास संपुषटात आली आहे. हा संघ हंगामातील सर्वात खराब संघ असल्याचं दिसतं आहे.
आता हैदराबाच्या प्लेऑफच्या शक्तांबद्दल बोलायचं झालं तर ते इतर संघांवर अवलंबून आहे. कारण, हैदराबाद शेवटचा सामनाही या मोसमातील शेवटच्या साखळी सामना आहे. यामध्ये त्यांची 22 मे रोजी पंजाब किंग्स संघासोबत सामना होईल. जे बारा गुणांसह सातव्या स्थानावर आहे. मात्र, याच्या एक दिवस आधी दिल्ली आणि मुंबई सामन्याला निकालाने संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होऊ शकते. दिल्ली जिंकल्यास प्लेऑफमध्ये पोहोचेल. ती हरली आणि त्याआधी बंगलुरूनेही गुजरातविरुद्धचा शेवटचा सामना गमावला, तरत हैदराबाद आणि पंजाबला शेवटच्या दिवशी आशा असतील.