PM Narednra Modi | ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयासाठी पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाचं कौतुक, खेळाडूंनी मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नव्या वर्षात पहिल्यांदाच मन की बातद्वारे देशावासियांशी संवाद साधला.
नवी दिल्ली : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर कसोटी मालिकेत (Border Gavaskar Tropy) ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियावर कौतुकांचा वर्षाव करण्यात आला. बीसीसीआने (Bcci) टीम इंडियाला बक्षिस म्हणून 5 कोटींचा बोनस जाहीर केला. तर आनंद महिंद्रा यांनी नव्या दमाच्या खेळाडूंना (mahindra suv thar) बक्षिस म्हणून भेट दिली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. मोदींनी ट्विट करत आणि मन की बात (Mann Ki Baat) या विशेष कार्यक्रमातील संवादादरम्यान टीम इंडियाचं कौतुक केलं. (PM Narendra Modi lauded Team India for their historic victory in the Test series against Australia)
मोदी काय म्हणाले?
“या महिन्यात क्रिकेटमधून गोड बातमी मिळाली. आमच्या क्रिकेट संघाने सुरुवातीच्या अडचणीनंतर शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली. आमच्या खेळाडूंची मेहनत आणि टीमवर्क ही प्रेरणादायक आहे”,असं ट्विट करत मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
मोदींनी टीम इंडियासाठी केलेलं ट्विट
इस महीने, क्रिकेट पिच से भी बहुत अच्छी खबर मिली | हमारी क्रिकेट टीम ने शुरुआती दिक्कतों के बाद, शानदार वापसी करते हुए ऑस्ट्रेलिया में सीरीज जीती | हमारे खिलाड़ियों का hard work और teamwork प्रेरित करने वाला है : PM @narendramodi #MannKiBaat
— PMO India (@PMOIndia) January 31, 2021
बीसीसीआयसह टीम इंडियाच्या खेळाडूंनी मोदींचे आभार मानले. “तुम्ही केलेल्या प्रशंसेसाठी आणि प्रोत्साहनासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. तिरंगा नेहमीच असाच फडकत राहो, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करु”, असं आश्वासन बीसीसीआयने ट्विद्वारे मोदींना दिलं.
बीसीसीआयने केलेले ट्विट
Thank you Shri @narendramodi ji for your appreciation and words of encouragement. #TeamIndia will do everything possible to keep the tricolour ?? flying high. @imVkohli @ajinkyarahane88 @RaviShastriOfc @RishabhPant17 @Jaspritbumrah93 @ImRo45 @JayShah @SGanguly99 @ThakurArunS https://t.co/fceD3bgO09
— BCCI (@BCCI) January 31, 2021
“आपल्या आत्मविश्वास वाढविणार्या शब्दांबद्दल धन्यवाद. देशाचे प्रतिनिधित्व करणे ही नेहमीच अभिमानाची गोष्ट असते. आम्ही प्रत्येकाला अशा प्रकारे प्रेरित करून पुढे जाण्याचा प्रयत्न करू”, असं म्हणत अजिंक्य रहाणेने मोदींचं आभार मानले. अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला हा विजय मिळवून दिला.
Thank you for your words of encouragement Shri @narendramodi Ji ? It’s always an honour to represent our country, we hope to continue inspiring more Indians as we move forward ?? https://t.co/8vxfrU3N4v
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) January 31, 2021
मोदींना या मन की बातदरम्यान बऱ्याच विषयाावर संवाद साधला. यावेळेस त्यांनी कोरोना लसबद्दल भाष्य केलं. “मेड इन इंडिया व्हॅक्सिन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असल्याचं ते म्हणाले. भारताची कोरोनाची लस संपूर्ण जागासाठी आशेचा किरण ठरली आहे. तसेच आपल्या देशातच जगातील सर्वाच मोठे लसीकरण सुरू आहे, असंही ते म्हणाले. गेल्या 15 दिवसात देशात 30 लाख कोविड योद्ध्यांना लस टोचली आहे. अमेरिकेला याच कामासाठी 18 तर ब्रिटन सारख्या समृद्ध देशाला 36 दिवस लागले”, याकडेही त्यांनी देशावासियांचे लक्ष वेधले.
संबंधित बातम्या :
Aus vs Ind 4th Test | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय
Mann Ki Baat: प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान पाहून देश दुखी झाला; मोदींनी मौन सोडलं
(PM Narendra Modi lauded Team India for their historic victory in the Test series against Australia)