टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप विजयाने संपूर्ण देश उत्साहात आहे. सगळ्या देशामध्ये गौरव, अभिमानाची भावना आहे. सर्वत्र टीम इंडियाच्या विजयाच सेलिब्रेशन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्व विजेत्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. या दरम्यान पीएम मोदी यांनी सहा खेळाडूंना स्पेशल थँक्स म्हटलं. बारबाडोसच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने 17 वर्षांनी T20 वर्ल्ड कप जिंकला. पीएम मोदी यांनी यावेळी कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि कोच राहुल द्रविड़ यांना स्पेशल थँक्स म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहित शर्माला शानदार कॅप्टनशिपसाठी शुभेच्छा दिल्या. पीएम मोदींनी, विराट कोहलीला शानदार इनिंग आणि भारतीय क्रिकेटमधील योगदानासाठी त्याच कौतुक केलं. सूर्यकुमार यादवने अखेरच्या क्षणी जी कॅच पकडली आणि हार्दिक पांड्याला लास्ट ओव्हरमधील गोलंदाजीसाठी शुभेच्छा दिल्या.
राहुल द्रविडचेही आभार मानले
जसप्रती बुमराहच्या योगदानाबद्दल मोदींनी त्याचं भरभरुन कौतुक केलं. भारतीय क्रिकेटमधील योगदानासाठी पीएम मोदींनी राहुल द्रविडचेही आभार मानले. भारताच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी लगेच टि्वट करुन टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. आपल्या टीमने शानदार अंदाजात टी 20 वर्ल्ड कप जिंकला, असं पीएम मोदी म्हणाले. “आम्हाला भारतीय टीमचा अभिमान आहे. आम्हा 140 कोटी भारतीयांना तुमचा अभिमान आहे” असं पीएम मोदी यांनी म्हटलं.
Dear @ImRo45,
You are excellence personified. Your aggressive mindset, batting and captaincy has given a new dimension to the Indian team. Your T20 career will be remembered fondly. Delighted to have spoken to you earlier today. pic.twitter.com/D5Ue9jHaad
— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2024
हा ऐतिहासिक सामना जिंकला
राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी टीम इंडियाला ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. पराभव न स्वीकारण्याच्या टीम इंडियाच्या जिद्दीच कौतुक केले. टॉस जिंकून टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. टीम इंडियाने सात विकेट गमावून 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका टीमने 169 धावा केल्या. भारताने 7 धावांनी हा ऐतिहासिक सामना जिंकला.