Narendra Modi Podcast : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-पाकिस्तान क्रिकेटबाबत काय म्हणाले? पाहा व्हीडिओ
Narendra Modi On IND vs PAK Cricket team : भारत की पाकिस्तान? दोघांपैकी सर्वोत्तम क्रिकेट संघ कोणता? असा प्रश्न पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. यावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? पाहा व्हीडिओ

भारत आणि पाकिस्तान या 2 शेजाऱ्यांमधील नातेसंबंध फार टोकाचे आहेत. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबतचे बहुतांश व्यवहार बंद करुन त्यांची खोड जिरवली आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट संघातही गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय मालिका झालेली नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात. त्यामुळे या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघामधील सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं. या हायव्होल्टेज सामन्यांकडे विविध क्षेत्रातील दिग्गजांचं लक्ष असतं. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अपवाद नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी भारत-पाकिस्तान दोन्ही क्रिकेट संघांपैकी सर्वोत्तम कोण? याबबत प्रतिक्रिया दिली. प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांना दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेटबाबत भाष्य केलं.
भारत-पाकिस्तान सामन्याबाबत प्रतिक्रिया काय?
पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खेळांसह आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट संघांबाबत प्रश्न केले. खेळांचा उद्देश हा ऊर्जा संचारित करण्याचा आहे. मी खेळांकडे मानवी विकासाच्या दृष्टीकोनातून पाहतो. तसेच मी खेळाची बदनामी होताना पाहू शकत नाही, असं मोदींनी म्हटलं.
भारत-पाकिस्तान क्रिकेट संघापैकी सर्वोत्तम कोण?
भारत आणि पाकिस्तान या दोघांपैकी सर्वोत्तम संघ कोणता? असा प्रश्न मोदींना करण्यात आला. मोदींनी या प्रश्नावर हुशारीने उत्तर दिलं. मी तज्ज्ञ नाही, असं मोदींनी म्हटलं. मात्र मोदींनी आपल्या अंदाजात कोणता संघ सर्वोत्तम आहे, हे सांगितलं.
“कोण चांगलं आणि कोण वाईट? हे मी तांत्रिकरित्या सांगू शकत नाही, मी यातील तज्ज्ञ नाही. ज्यांना क्रिकेटबाबत माहित आहे तेच सांगू शकतात. मात्र काही निकालांवरुन स्पष्ट होतं, काही दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला. सामन्याचा निकाल लागला, त्यावरुन स्पष्ट होईल की कोणता संघ सर्वोत्तम आहे”, असं मोदींनी म्हटलं.
भारत-पाकिस्तान क्रिकेट संघ आणि नरेंद्र मोदी
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत काही दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान आमनेसामने होते. उभयसंघात 23 फेब्रुवारीला सामना झाला. भारताने या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाने याआधी टी 20I वर्ल्ड कप 2024 आणि वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतही पाकिस्तानला पराभूत केलं होतं. टीम इंडियाने या तिन्ही सामन्यात पाकिस्तानवर मात केली. त्यामुळे पंतप्रधान मोदींना कोणता संघ सर्वोत्तम आहे? हे सांगण्याची गरज पडली नाही. पॉडकास्टरने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे आकडेवारीतूनच मिळतं. त्यामुळे भारतासमोर पाकिस्तान काहीच नाही, हे मोदींच्या न बोलण्यातूनच स्पष्ट होतं.