Sam Konstas ची शतकी खेळी, टीम इंडियासमोर 241 धावांचं आव्हान
Prime Ministers XI vs India Warm up Match 1st Innings Highlights : टीम इंडियाला सराव सामन्यात 241 धावांचं आव्हान मिळालं आहे. ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर ईलेव्हनकडून सॅम कोन्स्टास याने शतकी खेळी केली.
ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर ईलेव्हनने टीम इंडियासमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर ईलेव्हनने 43.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 240 धावा केल्या. सॅम कोन्स्टास याने सर्वाधिक धावा केल्या. सॅमने शतकी खेळी केली. तर हॅनो जेकब्स याने 61 आणि जॅक क्लेटन याने 40 धावांचं योगदान दिलं. त्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. आता टीम इंडिया हे आव्हान किती ओव्हरमध्ये पूर्ण करते? याकडे साऱ्याचं लक्ष असणार आहे.
पहिल्या डावात काय झालं?
टीम इंडियाने टॉस जिंकून ऑस्ट्रेलिया पीएम ईलेव्हनला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला झटपट 2 झटके दिले. त्यामुळे 2 बाद 22 अशी स्थिती झाली. त्यानंतर सॅम कोन्स्टास आणि जॅक क्लेटन या दोघांनी 109 धावांची भागीदारी केली. हर्षित राणा याने ही जोडी फोडली. हर्षितने या विकेटसह ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हनची दाणादाण उडवली. हर्षितने त्याच्या 2 षटकांमध्ये 4 विकेट्स घेतल्या आणि प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवर टाकलं. हर्षितने घेतलेल्या 4 विकेट्समुळे यजमानांची 131 बाद 2 वरुन 133 बाद 6 अशी झाली.
मात्र सॅम कोन्स्टासने एक बाजू लावून धरली. एका बाजूला सहकारी अपयशी ठरत असताना दुसऱ्या बाजूला या 19 वर्षीय सॅमने टीम इंडियाच्या घातक गोलंदाजांचा सामना करत शतक झळकावलं. मात्र सॅमला शतकानंतर फार वेळ मैदानात राहता आलं नाही. मात्र सॅमच्या या शतकामुळे ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट 43.2 ओव्हरमध्ये 240 धावांपर्यंत मजल मारता आली.
सॅमने 97 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 14 फोरसह 107 रन्स केल्या. हॅनो जेकब्स याने 61 धावांच्या खेळीत 2 षटकार आणि 4 चौकार लगावले. तर जॅक क्लेटन याने 6 चौकारांसह 40 धावांचं योगदान दिलं. दोघांना भोपळाही फोडता आल नाही. तर इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदांजांसमोर गुडघे टेकले. टीम इंडियाकडून हर्षित राणा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आकाश दीप याने दोघांना बाद केलं. तर मोहम्मद सिराद, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाला 240 धावांवर रोखलं
PM XI are all out for 240 runs.
Harshit Rana picks up four wickets, Akash Deep with two and Siraj, Prasidh, Washington and Jadeja pick a wicket each. pic.twitter.com/a2YxKXhn19
— BCCI (@BCCI) December 1, 2024
ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर प्लेइंग ईलेव्हन : जॅक एडवर्ड्स (कर्णधार), मॅट रेनशॉ, जॅक क्लेटन, ऑलिव्हर डेव्हिस, जेडेन गुडविन, सॅम हार्पर (विकेटकीपर), चार्ली अँडरसन, सॅम कोन्स्टास, स्कॉट बोलँड, लॉयड पोप, हॅनो जेकब्स, महली बियर्डमन, एडन ओ कॉनर, जेम रायन आणि जॅक निस्बेट.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद कृष्णा, सिराज , आकाश दीप, हर्षित राणा, सर्फराज खान, अभिमन्यू ईश्वरन आणि देवदत्त पडिक्कल.