IPL सोडून 5 वर्ष झाली तरीही या भारतीय गोलंदाजाचा विक्रम अबाधित, त्याच्याविरोधात धावा काढणं कठीण
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15 व्या सीझनमध्ये यंदा 10 संघ मैदानात उतरले आहेत. भारतीय क्रिकेटला या स्पर्धेमुळे वेगळीच शोभा आली आहे. क्रिकेटच्या महासंग्रामात उतरलेल्या एकाहून एक सरस खेळाडूंमध्ये एक गोलंदाज असाही दिसतोय, ज्याच्या नावावर एक खास रेकॉर्ड आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15 व्या सीझनमध्ये यंदा 10 संघ मैदानात उतरले आहेत. भारतीय क्रिकेटला या स्पर्धेमुळे वेगळीच शोभा आली आहे. क्रिकेटच्या महासंग्रामात उतरलेल्या एकाहून एक सरस खेळाडूंमध्ये एक गोलंदाज असाही दिसतोय, ज्याच्या नावावर एक खास रेकॉर्ड आहे. याने आपली शेवटची आयपीएल मॅच 5 वर्षांपूर्वी खेळली होती, मात्र त्याचा एक खास रेकॉर्ड आजही कायम आहे. हा गोलंदाज म्हणजे प्रवीण कुमार. आयपीएलमध्ये 5 संघांचं प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज प्रवीण कुमारने (Praveen Kumar) आपला शेवटचा आयपीएल सामना गुजरात लायन्सच्या संघाकडून खेळला होता. त्याच्या गोलंदाजीची जादू अशी होती की, त्याने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक मेडन ओव्हर (Maiden Over – निर्धाव षटकं) टाकली आहेत. प्रवीण कुमारच्या हा रेकॉर्ड आजवर कुठलाच गोलंदाज मोडू शकलेला नाही.
प्रवीण कुमार म्हणाला की, क्रिकेट पूर्णत: अनिश्चिततांचा खेळ आहे. यात चित्र बदलण्याची शक्यता हरेक क्षणी असते. कू वर पोस्ट करून प्रवीणने ही गोष्ट सांगितली. या खेळाबाबत असे म्हटले जाते, की हा फलंदाजांसाठी तुलनेने सोपा आणि फायद्याचा खेळ आहे, पण गोलंदाजांसाठी खूप अवघड आहे. पण याच साच्यात खेळणारा प्रवीण कुमार हा असा खेळाडू आहे, ज्याने फलंदाजांना धावांसाठी अक्षरश: तरसवले आहे.
2010 मध्ये प्रवीण कुमारची हॅट्ट्रिक
प्रवीण कुमार आयपीएलमध्ये पाच संघांकडून खेळला आहे. आयपीएलच्या सुरवातीच्या दोन सीझन्समध्ये प्रवीण कुमार रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा भाग होता. यादरम्यान 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांने हॅट्रिकही घेतली होती. असा करणारा तो आयपीएलमधील 7 वा गोलंदाज होता. 2011 ते 2013 दरम्यान प्रवीण किंग्स इलेवन पंजाबसाठी खेळला.
90 आयपीएल विकेट्स
प्रवीण कुमारने 2008 ते 2017 दरम्यान चार संघ, अर्थात किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळत आयपीएलमध्ये 14 निर्धाव षटकं टाकली आहेत. प्रवीण कुमारच्या विरोधात धावा काढण अतिशय अवघड असायचं. प्रवीण कुमारच्या आयपीएल करियरबद्दल बोलायचे तर आयपीएलच्या 119 सामन्यांमध्ये प्रवीण कुमारने 90 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत.
इतर बातम्या
MI vs CSK IPL 2022: अरेरे, Rohit Sharma च्या नावावर IPL मधल्या सर्वात खराब रेकॉर्डची नोंद
MI vs CSK IPL 2022: इशान किशन खाली पडला, मुकेश चौधरीच्या जबरदस्त यॉर्करवर विकेट, Watch VIDEO