Prithvi Shaw : इंग्लंडविरुद्ध वगळलं, मात्र विजय हजारे ट्रॉफीत बरसला, पृथ्वी शॉचा झंझावात, वेगवान 227* धावा

Prithvi Shaw double century : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वी शॉने मुंबईकडून (Mumbai team) खेळताना वादळी द्विशतक ठोकलं आहे.

Prithvi Shaw : इंग्लंडविरुद्ध वगळलं, मात्र विजय हजारे ट्रॉफीत बरसला, पृथ्वी शॉचा झंझावात, वेगवान  227* धावा
prithvi shaw
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 2:58 PM

Vijay Hazare Trophy : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी (Ind vs Eng 3rd test) मालिकेसाठी टीम इंडियातून वगळल्यानंतर मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw ) देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत झंझावात करत आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वी शॉने मुंबईकडून (Mumbai team) खेळताना वादळी द्विशतक ठोकलं आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळताना, पुद्दुचेरीविरोधात पृथ्वी शॉने दणक्यात खेळी केली. पृथ्वी शॉने अवघ्या 142 चेंडूत द्विशतक झळकावलं. नाबाद 227 धावा ठोकणारा पृथ्वी शॉ भारताचा लिस्ट ए मधील सातवा तर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील चौथा द्विशतकवीर ठरला. पृथ्वी शॉच्या द्विशतकामुळे मुंबईने निर्धारित 50 षटकात 4 बाद 457 धावा कुटल्या.

21 वर्षीय पृथ्वी शॉने आपल्या झंझावाती खेळीत 31 चौकार आणि  5 षटकार ठोकले. पृथ्वी शॉने 152 चेंडूत नाबाद 227 धावा ठोकल्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एखाद्या कर्णधाराने ठोकलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे.

मुंबई विरुद्ध पुद्दुचेरी

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज मुंबई विरुद्ध पुद्दुचेरी यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी पृथ्वी शॉ संघाचं नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच नेतृत्त्व करताना, पृथ्वी शॉने पुद्दुचेरीच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली.

लिस्ट ए मध्ये द्विशतक ठोकणारे फलंदाज

लिस्ट ए मध्ये यापूर्वी सहा जणांनी द्विशतकं झळकावली आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, शिखर धवन, संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांचा समावेश आहे. या यादीत आता पृथ्वी शॉचं नाव समाविष्ट झालं आहे.

दिल्लीविरुद्धही शतक 

विजय हजारे ट्रॉफीतील पृथ्वी शॉचं हे दुसरं शतक आहे. यापूर्वी दिल्लीविरुद्धच्या लढतीत पृथ्वी शॉने नाबाद 105 धावा ठोकल्या होत्या.

सूर्यकुमार यादवच्याही घणाघाती 133 धावा

एकीकडे पृथ्वी शॉ बरसत होता तर दुसरीकडे मुंबईचा सूर्यकुमार यादवही तळपत होता. कारण सूर्यकुमार यादवने अवघ्या 58 चेंडूत 133 धावा ठोकल्या. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांच्यात जणू फटकेबाजीची स्पर्धाच लागली होती. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवने तिसऱ्या विकेटसाठी 103 चेंडूत तब्बल 201 धावांची भागीदारी रचली.

संबंधित बातम्या 

India vs England 3rd Test 2nd Day Live | रोहित शर्मा-अजिंक्य रहाणे मुंबईकर जोडी मैदानात, आघाडीसासाठी 13 धावांची गरज

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.