Prithvi Shaw | पृथ्वीची प्रतिक्षा अखेर संपली, 2 फेब्रुवारीपासून ‘या’ सामन्यातून मैदानात
Prithvi Shaw | पृथ्वी शॉ गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीमुळे टीममधून बाहेर होता. मात्र अखेर पृथ्वीने कमबॅक केलंय. इतकंच नाही, तर पृथ्वीला प्लेईंग ईलेव्हनमध्येही संधी देण्यात आलीय.
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणममध्ये खेळवण्यात येणार आहे. या दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हन जाहीर केलीय. तर दुसऱ्या बाजूला भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन पृथ्वी शॉ याची अखेर 6 महिन्यानंतर प्रतिक्षा संपली आहे. पृथ्वीची अखेर टीममध्ये एन्ट्री झाली आहे. पृथ्वी आता 2 फेब्रुवारीपासून होणाऱ्या सामन्यातून खेळणार आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार सध्या सुरु आहे. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई टीम खेळतेय. आता पृथ्वी मुंबई टीममध्ये परतलाय. मुंबईचा पुढील सामना हा बंगाल विरुद्ध 2 फेब्रुवारीला आहे. पृथ्वीचा बंगाल विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. पृथ्वी गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापती आणि इतर वादांमुळे चांगलाच चर्चेत राहिला. ऑफ फिल्ड वादात असणारा पृथ्वी अखेर आता ऑन फिल्ड परतणार आहे. त्यामुळे पृथ्वीच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
पृथ्वीला 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यात दुखापत झाली होती. पृथ्वी तेव्हा इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळता होता. पृथ्वीवर दुखापतीनंतर शस्त्रक्रिया पार पडली. पृथ्वी त्यानंतर बंगळुरुतील एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट अकादमीत फिट होण्यासाठी गेला. आता पृथ्वीने सर्व औपचारिकता पूर्ण केलेल्या आहेत. एनसीएने पृथ्वीला खेळण्यासाठी पूर्णपणे फिट असल्याचं जाहीर केलंय, अशी माहिती एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी दिली. यानंतर पृथ्वीला मुंबई टीममध्ये सामील करण्यात आलं.
दरम्यान मुंबई विरुद्ध बंगाल यांच्यातील बी ग्रुपमधील सामना हा इडन गार्डन कोलकाता येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला 2 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. पृथ्वी आता या सामन्यात बॅटिंगने कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांच लक्ष असणार आहे.
मुंबई टीम | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ जय गोकुळ बिस्ता, भूपेन ललवाणी, प्रसाद पवार (विकेटकीपर), सुवेद पारकर, शिवम दुबे, हार्दिक तामोरे, सिल्वेस्टर डीसूझा, रॉयस्टन डायस, तनुष कोटीयन, धवल कुलकर्णी, अथर्व अंकोलेकर आणि मोहित अवस्थी.
बंगाल टीम : मनोज तिवारी (कॅप्टन), सौरव पॉल, श्रेयांश घोष, मोहम्मद कैफ, अभिषेक पोरेल (डब्ल्यू), अनुस्तुप मजुमदार, प्रदिप्ता प्रामाणिक, इशान पोरेल, सुभम चॅटर्जी, प्रेयस बर्मन, करण लाल, सुदीप कुमार घरामी, रणज्योत सिंग, अंकित मिश्रा, कौशिक मैती, सुमन दास आणि सूरज सिंधू जयस्वाल.