Prithvi Shaw : टीम इंडियाकडून संधी नाही, या संघाकडून ठोकली दमदार फिफ्टी
Cricket News : आऊट ऑफ फॉर्म असलेल्या या खेळाडूने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी परदेशात जाऊन क्रिकेट खेळत आहे. यासाठी या खेळाडूने काही काळासाठी आपल्या डोमेस्टिक संघाकडूनही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : भारतीय संघ सध्या विंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर संघाने उत्तम प्रदर्शन करत कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विंडिजला पराभूत केलं आहे. अशातच भारतीय संघाचा एक खेळाडू भारत सोडून परदेशात क्रिकेट खेळायला गेला आहे. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या या खेळाडूने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी परदेशात जाऊन क्रिकेट खेळायचा निर्णय घेतला आहे. यासाठी या खेळाडूने काही काळासाठी आपल्या डोमेस्टिक संघाकडूनही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय संघामध्ये स्थान मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेला भारतीय संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ काउंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. या स्पर्धेत नॉर्थम्प्टनशायर या संघासाठी पृथ्वी शॉ खेळत आहे. तसेच यानंतर होणाऱ्या रॉयल लंडन वनडे कप मध्येही पृथ्वी शॉ खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पृथ्वी शॉने फटकेबाजी केली. अवघ्या 39 चेंडूत 65 धावांची तुफानी खेळी केली आहे.
U-19 विश्वचषकामधून सुरुवात करत गिल आणि पृथ्वी शॉ या दोघांनीही भारतीय संघाची दारे ठोठावली होती. तसेच भारताकडून खेळल्या गेलेल्या पहिल्याचं कसोटी सामन्यात शॉ ने शतक मारत आपल्या नावाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडली होती. त्यानंतर शॉ ने भारतीय संघाकडून खेळत काही खास प्रदर्शन केले नाही. त्यामुळे त्याला संघाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतरही त्याला संघात संधी मिळाली पण त्याला त्या संधीचे सोनं करण्यात तो यशस्वी ठरला नाही.
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषकासाठी अजूनही भारताचा संघ घोषित झालेला नाही. अशातच अनेक खेळाडू या भारतात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी चांगले प्रदर्शन करुन आपले स्थान संघात बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. अशातच भारतातचं नव्हे तर विदेशी स्पर्धांमध्ये खेळून संघात संधी मिळवण्यासाठी पृथ्वी शॉ अथक प्रयत्न करत आहे.