PSL 2021 | चोप चोप चोपला, ‘स्टेन गन’ डेलच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी, एकाच ओव्हरमध्ये लुटल्या 21 धावा

पाकिस्तान सुपर लीग 2021 मध्ये (psl 2021) डेल स्टेनच्या (Dale Steyn) गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज जोरदार फटकेबाजी करत आहेत.

PSL 2021 | चोप चोप चोपला, 'स्टेन गन' डेलच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी, एकाच ओव्हरमध्ये लुटल्या 21 धावा
पाकिस्तान सुपर लीग 2021 मध्ये (psl 2021) डेल स्टेनच्या (Dale Steyn) गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज जोरदार फटकेबाजी करत आहेत.
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 12:58 PM

इस्लामाबाद | पाकिस्तानमध्ये सध्या पीएसएल (Pakistan Super League 2021) स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत दररोज नवनवीन रेकॉर्ड होत असतात. टी 20 क्रिकेट म्हणजे जोरदार फटकेबाजी, चौकार आणि षटकारांचा पाऊस. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज (Dale Styen) डेल स्टेन (Quetta Gladiators) संघाचे प्रतिनिधित्व करतोय. डेल स्टेन आपल्या आक्रमक आणि वेगवान गोलंदाजीसाठी परिचित आहे. पण स्टेने ही लय गेल्या काही महिन्यांपासून गमावली आहे. अनेक फलंदाज स्टेनच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी करत आहेत. 26 फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात स्टेनच्या गोलंदाजीवर (Peshawar Zalmi) च्या फलंदाजाने फटकेबाजी करत विजयाचा मार्ग सोप्पा केला. (psl 2021 Peshawar Zalmi vs Quetta Gladiators Dale Steyn given 21 runs in the 19th over)

क्वेटा ग्लेडिएटर्स विरुद्ध पेशावर झालमी यांच्यात 26 फेब्रुवारीला सामना खेळण्यात आला. या सामन्यात पेशावरने नाणेफेक जिंकून क्वेटाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन सरफराज अहमदने 40 चेंडूत 81 धावांची वादळी खेळी केली. या जोरावर क्वेटाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 198 धावा केल्या. यामुळे पेशावरला विजयासाठी 199 धावांचे आव्हान मिळाले. या स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही संघाने इतक्या मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. पण डेल स्टेनची 19 व्या ओव्हरमध्ये जोरदार धुलाई केली.

चौकार आणि षटकाराचां पाऊस

स्टेन सामन्याच्या दुसऱ्या डावात 19 वी ओव्हर टाकायला आला. तेव्हा पेशावर ला विजयासाठी 27 धावांची आवश्यकता होती. पेशावरकडून मैदानात स्ट्राईकवर वाहेब रियाज आणि नॉन स्ट्राईक एंडवर रुदरफोर्ड खेळत होता.

असा रंगला थरार

स्टेनच्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर रुदरफोर्डने जोरदार सिक्सर खेचला. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत रुदरफोर्डने रियाजला संधी दिली. रियाजने चौथ्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचला. हा सिक्स तब्बल 102 मीटर इतका लांब गेला. यानंतर पुन्हा पाचव्या चेंडूवर रियाजने 98 मीटरचा सिक्स खेचला. रियाजने स्टेनच्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर सिंगल रन घेत एकूण 21 धावा वसूल केल्या. यामुळे अखेरच्या षटकात पेशावरने सहजपणे 6 धावा पूर्ण केल्या. यासह पेशावर पीएसलच्या इतिहासात मोठ्या आव्हानाचं पाठलाग करण्यात यशस्वी राहिली. शेरफॅन रुदरफोर्ड आणि वाहेब रियाज या विजयाचे हिरो ठरले.

आयपीएल 2020 मध्येही स्टेनची धुलाई

दरम्यान स्टेनला असा चोपण्याची ही काही पहिली वेळ नाही. स्टेनने आयपीएलच्या 13 व्या मोसमात 19 व्या ओव्हरमध्ये 26 धावा दिल्या होत्या. यामुळे बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला होता.

डेल स्टेनची आयपीएल कारकिर्द

डेल स्टेनने आयपीएलमध्ये एकूण 95 सामने खेळला. या 95 सामन्यांमध्ये त्याने 25.85 च्या सरासरीने आणि 6.91 या इकॉनॉमी रेटने एकूण 97 विकेट्स घेतल्या. 8 धावा देऊन 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली.

स्टेनने ऑगस्ट 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. स्टेनने एकूण 93 कसोटींमध्ये 439 विकेट्स घेतल्या. कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्टेन आफ्रिकेसाठी एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटमध्ये खेळतोय.

संबंधित बातम्या :

Dale Steyn | नववर्षाच्या सुरुवातीला आफ्रिकेच्या ‘स्टेन गन’ची मोठी घोषणा, आयपीएलमध्ये खेळणार नाही

(psl 2021 Peshawar Zalmi vs Quetta Gladiators Dale Steyn given 21 runs in the 19th over)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.