PSL मधील टीम लाहोर कलंदर्सने जाणूनबुजून भारतीयांना भडकवलं, फॅन्सनी करुन दिली कंगालीची आठवण

| Updated on: Feb 19, 2023 | 10:01 AM

शाहीन आफ्रिदीची टीम मैदानात चांगलं प्रदर्शन करत आहे. पण मैदानाबाहेर त्यांनी अत्यंत खालच्या पातळीची कृती केली. त्यामुळे भारतीय फॅन्सचा पारा चढला. लाहोर कलंदर्सने आपला प्लेयर हुसैन तलाटचा फोटो शेअर केला. त्याच्या हातात एक कप होता.

PSL मधील टीम लाहोर कलंदर्सने जाणूनबुजून भारतीयांना भडकवलं, फॅन्सनी करुन दिली कंगालीची आठवण
lahore qalandars
Image Credit source: twitter
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीगचे सामने सुरु आहेत. लाहोर कलंदर्सची टीम विद्यमान चॅम्पियन आहे. यंदाच्या सीजनमध्येही लाहोर कलंदर्सची टीम विजेतेपद मिळवेल, अशी शक्यता आहे. शाहीन आफ्रिदीची टीम मैदानात चांगलं प्रदर्शन करत आहे. पण मैदानाबाहेर त्यांनी अत्यंत खालच्या पातळीची कृती केली. त्यामुळे भारतीय फॅन्सचा पारा चढला. इंडियन एअर फोर्सचे अधिकारी अभिनंदन वर्थमान यांच्यावरुन एक टि्वट लाहोर कलंदर्सने केलं. त्यानंतर सोशल मीडियावर नवीन वॉर सुरु झालय.

लाहोर कलंदर्सने आपला प्लेयर हुसैन तलाटचा फोटो शेअर केला. त्याच्या हातात एक कप होता. कलंदर्सच्या टीमने या फोटोला वादग्रस्त कॅप्शन दिलं. ‘हे तर टी इज फँटेस्टिक झालं’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. त्यानंतर खवळलेल्या फॅन्सनी लाहोर कलंदर्स टीमला ट्रोल करण्यास सुरुवात केली.


भारतीयांना कमीपणा दाखवण्यासाठी या वाक्याचा उपयोग

पाकिस्तानी फॅन्स भारतीयांवर निशाणा साधण्यासाठी ‘टी इज फँटेस्टिक’ वाक्याचा उपयोग करतात. भारतीय हवाई दलाचे अधिकारी अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने कैद केलं होतं. अभिनंदन ताब्यात असताना पाकिस्तानने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात अभिनंदन यांना चहा कशी आहे? असं विचारण्यात आलं. त्यावर अभिनंदन यांनी ‘टी इज फँटेस्टिक’ असं उत्तर दिलं. तेव्हापासून पाकिस्तानी फॅन्स भारतीयांना कमीपणा दाखवण्यासाठी या वाक्याचा उपयोग करतात.

भारतीय फॅन्सच सडेतोड प्रत्युत्तर

लाहोर कलंदर्सच्या टीमला त्यांच्या या कृतीची किंमत चुकवावी लागलीय. या टि्वटने भारतीय फॅन्सचा पारा चढला. टि्वटरवर एक नवीन युद्धा सुरु झालय. भारतीय फॅन्सनी पाकिस्तानला त्यांच्या कंगालीची आठवण करुन दिली.
“तुम्हाला चहा पण उधारीवर घ्यावी लागते. हे, तर कंगाल झालेत. आधी धान्य खरेदी करण्या लायक बना” या शब्दात भारतीय फॅन्सनी पाकिस्तानला जागा दाखवून दिली. त्याशिवाय मीम्स शेअर करुन पाकिस्तानची इज्जत काढली.