पंजाब किंग्जच्या या खेळाडूला लिलावात ठरल्याप्रमाणे 2.4 कोटी रुपये मिळणार नाहीत! कारण झालं असं की..
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पंजाब किंग्जची झोळी अद्याप रितीच आहे. पंजाब किंग्जने आतापर्यंत महागड्या खेळाडूंसह बरेच डावपेच आखले. पण त्यात काही यश मिळालं नाही. आता नव्या पर्वात पुन्हा एकदा पंजाब किंग्ज जेतेपदासाठी सज्ज आहे. पण एक खेळाडूला दणका बसण्याची शक्यता आहे.

पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरवर मोठी बोली लावत आपल्या संघात घेतलं. जेणेकरून नव्या पर्वात जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होईल. त्यासोबत मेगा लिलावात आपल्या मनासारखी टीमही बांधली. रिकी पाँटिंगकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली आणि आता आयपीएलसाठी सज्ज झाले. पण अष्टपैलू अझमतुल्लाह ओमरझाईचा एका निर्णयामुले पंजाब किंग्जचं मोठं नुकसान होऊ शकतं. वैयक्तिक कारणांमुळे हा खेळाडू संघात उशिराने सहभागी होणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे ओमरझाईला पूर्ण पैसे मिळणार नाही. ओमरझाीला 2.4 कोटी खर्च करून पंजाब किंग्जने आपल्या संघात घेतलं आहे. पण नियमानुसार, जर खेळाडू स्पर्धेत उशिराने सहभागी झाला तर मात्र त्याचे पैसे कापले जातील. रिपोर्टनुसार, आयसीसी वनडे प्लेयर ऑफ द ईयर ओमरझाई 20 एप्रिलपर्यंत संघासोबत येईल. पंजाब किंग्जचा पहिला सामना 25 मार्चला अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्ससोबत होणार आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेत कर्णधार श्रेयस अय्यर आणि हेड कोच रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरु झाली आहे. पाँटिंग धर्मशाळेत टीमसोबत रूजू झाला आहे. टीम इंडियाचे खेळाडूही चमूत सहभागी झाले आहेत. यात युझवेंद्र चहलचा सहभाग होता. या पर्वात पंजाब किंग्ज तीन सामने धर्मशाळेत खेळणार आहे. आयपीएल सूत्रांनी सांगितलं की, ‘ओमरझाईच्या घरात काही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे 20 एप्रिलला भारतात येईल. तर विदेशी खेळाडू सोमवारीपासून संघात सहभागी झाले आहेत.’
मागच्या पर्वात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे पंजाब किंग्जला त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत. केकेआरने रिलीज केल्यानंतर सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. आयपीएल इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू आहे. श्रेयस अय्यर पंजाब किंग्ज फ्रेंचायझीचं स्वप्न पूर्ण करतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. श्रेयससोबत या संघात मार्को यानसन, ओमरझाई, मार्कस स्टोयनिस आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत.
पंजाब किंग्ज: आयपीएल 2025 चा संपूर्ण संघ
श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, विशाक विजयकुमार, यश ठाकूर, हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, मार्को यानसेन, लॉकी फर्ग्युसन, जोश इंग्लिस, झेवियर बार्टलेट, कुलदीप खान, कुलदीप शेंडे, कुलदीप खान, मुरली खान हरनूर पन्नू, आरोन हार्डी, प्रियांश आर्य, अजमतुल्ला उमरझाई