PBKS vs GT, IPL 2022: क्रिकेट रसिकांना आज आयपीएलमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सवर (GT vs PBKS) शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. सलामीवीर शुभमन गिलने (Shubhaman Gill) 59 चेंडूत 96 धावांची खेळी करुन विजयाचा पाया रचला, तर राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) त्यावर कळस चढवण्याचं काम केलं. शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सला विजयासाठी सहा चेंडूत 19 धावांची गरज होती. पंजाब किंग्सचा ओडियन स्मिथ षटक टाकत होता. स्मिथने पहिला चेंडू वाईड टाकला. विजयासाठी सहा चेंडूत 18 धावा हव्या होत्या. त्यावेळी डेविड मिलरने धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यात चांगली फलंदाजी करणारा हार्दिक पंड्या रनआऊट झाला. अखेरच्या दोन चेंडूत विजयासाठी 12 धावांची गरज होती. राहुल तेवितया स्ट्राइकवर होता. त्याने दोन चेंडूत दोन षटकार ठोकून गुजरातला रोमांचक विजय मिळवून दिला.
दोन चेंडूत 12 धावांची गरज असताना राहुल तेवतियाने दोन षटकार ठोकून गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला आहे. पंजाबने विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य दिलं होतं. हे आव्हान गुजरात टायटन्सने पार केलं आहे.
SIX, SIX – that’s the tweet! That’s the match! That’s @rahultewatia02 for you! #AavaDe #PBKSvGT #SeasonOfFirsts
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 8, 2022
गुजरातला विजयासाठी 5 चेंडूत 18 धावांची गरज आहे. शुभमन गिल 96 धावांवर आऊट झाला. हार्दिक पंड्या मोक्याच्याक्षणी 27 धावांवर रनआऊट झाला.
गुजरातला विजयासाठी 6 चेंडूत 19 धावांची गरज आहे. शुभमन गिल 96 धावांवर आऊट झाला.
गुजरात टायटन्सच्या 18 षटकात दोन बाद 158 धावा झाल्या आहेत.
गुजरातला 18 चेंडूत विजयासाठी 38 धावांची गरज आहे. शुभमन गिल 92 आणि हार्दिक पंड्या 15 धावांवर खेळतोय.
16 ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या दोन बाद 140 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 90 आणि हार्दिक पंड्या 6 धावांवर खेळतोय.
सलग दुसऱ्या सामन्यात शुभमन गिलची जबरदस्त फलंदाजी सुरु आहे. गुजरात टायटन्सच्या तेरा षटकात एक बाद 119 धावा झाल्या आहेत. गिल 80 धावांवर खेळतोय.
12 षटकात गुजरात टायटन्सच्या एक बाद 110 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 73 धावांवर आणि साई सुदर्शन 28 धावांवर खेळतोय.
शुभमन गिलने सलग दुसरी हाफ सेंच्युरी झळकवली आहे. गुजरात टायटन्सच्या नऊ षटकात एक बाद 88 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 32 चेंडूत 58 आणि साई सुदर्शन 22 धावांवर खेळतोय.
5⃣0⃣ for Gill. Aapki raat bhi Shub rahe! ?#PBKSvGT | #AavaDe | #TATAIPL | #SeasonOfFirsts https://t.co/IqtZ1zUoNz
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 8, 2022
आठ षटकात गुजरात टायटन्सच्या एक बाद 76 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 47 आणि साई सुदर्शन 20 धावांवर खेळतोय.
ओडियन स्मिथच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने मिडविकेटला षटकार ठोकला. 25 चेंडूत तो 45 धावांवर खेळतोय.
शुभमन गिल चांगली फलंदाजी करतोय. पावरप्लेमध्ये गुजरात टायटन्सच्या एक बाद 53 धावा झाल्या आहेत. रबाडाच्या गोलंदाजीवर सलामीवीर मॅथ्यू वेडने सहा धावांवर बेअरस्टोकडे झेल दिला. शुभमन गिल 33 आणि साई सुदर्शन 19 धावांवर खेळतोय.
Sudharsan, Su pra-dharsan 6⃣! ?#PBKSvGT | #AavaDe | #TATAIPL | #SeasonOfFirsts
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 8, 2022
राहुल चाहर आणि अर्शदीप सिंह मध्ये शेवटच्या विकेटसाठी 27 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. गुजरात टायटन्सने सामन्यावर पकड बनवण्याची संधी गमावली. राहुल चाहरने नाबाद 22 आणि अर्शदीप सिंहने नाबाद 10 धावा केल्या. पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य दिले आहे.
???? ??????????? ??????? ?????? ??? ???????? ???????? ?? ?? ??????? ?? ????! ?#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #PBKSvGT pic.twitter.com/TgZuseJYXM
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 8, 2022
पंजाब किंग्सचा डाव अडचणीत सापडला आहे. त्यांच्या आठ विकेट गेल्या आहेत. कागिसो रबाडा एक रन्सवर रनआऊट झाला.
लिविंगस्टोन पाठोपाठ शाहरुख खान आऊट झाला आहे. राशिद खानने त्याला पायचीत पकडलं. शाहरुखने आठ चेंडूत 15 धावा केल्या. यात दोन षटकार होते. राशिद खानने 16 व्या षटकात दोन विकेट काढल्या.
धमाकेदार फलंदाजी करणारा लिविंगस्टोन अखेर OUT झाला आहे. राशिद खानने त्याला मिलरकरवी झेलबाद केलं. लिविंगस्टोनने 27 चेंडूत 64 धावा केल्या. त्यान सात चौकार आणि चार षटकार ठोकले. पंजाब किंग्सच्या सहा बाद 154 धावा झाल्या आहेत.
Rashid does it again! ?
Liam departs after a well-played 64. ?#PBKSvGT | #AavaDe | #TATAIPL
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 8, 2022
लियाम लिविंगस्टोन आणि शाहरुख खानची धमाकेदार फलंदाजी सुरु आहे. 15 षटकात पंजाबच्या पाच बाद 152 धावा झाल्या आहेत.
दर्शन नालकंडेने लागोपाठच्या चेंडूंवर जितेश शर्मा आणि ओडियन स्मिथची विकेट काढली. जितेश शर्माने 23 धावा केल्या. स्मिथ भोपळाही न फोडता तंबूत परतला.
Darshan’s second wicket – Odean Smith! ?? https://t.co/0xLfnmFMXF
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 8, 2022
गुजरात टायटन्सच्या राहुल तेवितयाचं 13 व षटक महागडं ठरलं आहे. या ओव्हरमध्ये जितेश शर्मा आणि लिविंगस्टोनने धावा लुटल्या. त्यांनी एका ओव्हरमध्ये 24 धावा वसूल केल्या. लिविंगस्टोनने सिक्स मारुन अर्धशतक पूर्ण केलं.
Liam Living-in a fast lane! ⚡
Second fastest fifty of #IPL2022! ?#SaddaPunjab #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #PBKSvGT @liaml4893 pic.twitter.com/mKhM3xfyRb
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 8, 2022
मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही लियाम लिविंगस्टोन धमाकेदार फलंदाजी करत आहे. त्याने आतापर्यंत 14 चेंडूत 36 धावा केल्या आहेत. यात तीन चौकार आणि तीन षटकार आहेत. दरम्यान शिखर धवन 35 धावांवर आऊट झाला आहे. राशिद खानने विकेट काढली. पंजाब किंग्सच्या तीन बाद 86 धावा झाल्या आहेत.
Rashid’s Dha-wan who gives us the crucial breakthrough! ?#PBKSvGT | #AavaDe | #TATAIPL
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 8, 2022
पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात PBKS च्या दोन बाद 43 धावा झाल्या आहेत. शिखर धवन 24 आणि लियाम लिविंगस्टोन 5 धावांवर खेळतोय.
पंजाब किंग्सला दुसरा झटका बसला आहे. लॉकी फर्ग्युसनने जॉनी बेअरस्टोला आठ धावांवर आऊट केलं. पंजाब किंग्सच्या पाच षटकात दोन बाद 38 धावा झाल्या आहेत.
PBKS ला पहिला झटका बसला आहे. हार्दिकने यश मिळवून दिलं आहे. कॅप्टन मयंक अग्रवालला हार्दिकने राशिद खानकरवी पाच धावांवर झेलबाद केलं. पंजाबच्या दोन षटकात एक बाद 12 धावा झाल्या आहेत.
Captain calling captain! Let’s go, @hardikpandya7! ? #PBKSvGT | #AavaDe | #TATAIPL | #SeasonOfFirsts
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 8, 2022
मोहम्मद शमीने पहिलं षटक टाकलं. पंजाब किंग्सच्या बिनबाद 5 धावा झाल्या आहेत. मयंक अग्रवाल आणि शिखर धवनची जोडी मैदानात आहे.
Just 1⃣ change: Bairstow ? Bhanuka! #SherSquad, thoughts? ?#SaddaPunjab #PBKSvGT #IPL2022 #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ pic.twitter.com/QmDmi8uFBR
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 8, 2022
2️⃣ debutants begin their #SeasonOfFirsts – B Sai Sudharsan and Darshan Nalkande ?#PBKSvGT | #AavaDe | #TATAIPL pic.twitter.com/CMUSZa4rQW
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 8, 2022