GT vs PBKS : शशांक सिंह-आशुतोष शर्मा जोडीची गेमचेजिंग खेळी, पंजाबचा गुजरातवर 3 विकेट्सने विजय
IPL 2024 GT vs PBKS Match Highlights In Marathi : शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा ही जोडी पंजाबच्या विजयाची शिल्पकार ठरली. गुजरातने पंजाबला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं.
पंजाबने शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या आणि रंगतदार झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. गुजरातने पंजाबला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 19.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं. शशांक सिंह या पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तसेच आशुतोष शर्मा यानेही शशांकला चांगली साथ देत निर्णायक भूमिका बजावली. पंजाबचा हा या मोसमातील चौथ्या सामन्यातील दुसरा विजय ठरला. तर गुजरातचा दुसरा पराभव ठरला.
शशांक आणि आशुतोष विजयी जोडी
शशांक शर्मा आणि आशुतोष शर्मा (इमपॅक्ट प्लेअर) या दोघांनी सामना पंजाबच्या बाजुने झुकवला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 43 धावांची निर्णायक भागीदारी केली. ही भागीदारीच गुजरातच्या पराभवाचं कारण ठरली. त्यानंतर आशुतोष 17 बॉलमध्ये 3 चौकार आणि 1 सिक्ससह 31 धावा करुन माघारी परतला. तर त्यानंतर शशांकने हरप्रीत ब्रार याच्यासह पंजाबला विजयापर्यंत पोहचवलं. शशांकने 29 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने 210.34 च्या स्ट्राईक रेटने 61 धावांची नाबाद खेळी केली.
तर या दोघांव्यतिरिक्त कॅप्टन शिखर धवन याने 1, जॉनी बेयरस्टो 22, प्रभसिमरन सिंह 35, सॅम करन 5, सिकंदर रझा 15, जितेश शर्मा 16 आणि हरप्रीत ब्रार याने नाबाद 1 धाव केली. तर गुजरातकडून नूर अहमद याने 2 विकेट्स घेतल्या. तर अझमतुल्लाह ओमरझई, उमेश यादव, राशिद खान, मोहित शर्मा आणि दर्शन नळकांडे या 5 जणांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
गुजरातची बॅटिंग
त्याआधी पंजाबने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगससाठी भाग पाडलं. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. गुजरातकडून कॅप्टन शुबमन गिल पंजाबला एकटाच भिडला. ओपनिंगला आलेला शुबमन गिल याने अखेरपर्यंत नाबाद राहिला. शुबमनने 48 बॉलमध्ये नॉट आऊट 89 रन्स केल्या. शुबमन व्यतिरिक्त ऋद्धीमान साह 11, केन विलियमसन 26, साई सुदर्शन 33, विजय शंकर 8 आणि राहुल तेवतिया याने 23* धावा केल्या. तर पंजाबकडून कगिसो रबाडा याने 2 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेल आणि हरप्रीत ब्रार या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
पंजाबचा विजयी क्षण
2️⃣ Points ✅
Young guns Shashank Singh and Ashutosh Sharma win it for @PunjabKingsIPL 🙌
They get over the line as they beat #GT by 3 wickets 👍
Scorecard ▶️ https://t.co/0Sy2civoOa #TATAIPL | #GTvPBKS pic.twitter.com/m7b5f8jLbz
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2024
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, सॅम करान, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.
गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, केन विल्यमसन, विजय शंकर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव आणि दर्शन नळकांडे.