Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : पीव्ही सिंधू, बजरंग पुनियाचा सुपर डान्स, पाहा व्हिडीओ

देशासह राज्यात नवरात्रीचा उत्साह असून क्रीडाविश्वातील दिग्गज देखील गरब्यात भाग घेताना दिसतायत.

VIDEO : पीव्ही सिंधू, बजरंग पुनियाचा सुपर डान्स, पाहा व्हिडीओ
पीव्ही सिंधू, बजरंग पुनियाचा सुपर डान्सImage Credit source: social
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 5:17 PM

नवी दिल्ली :  देशात सध्या नवरात्रीचा उत्साह (Navratri Festival) असून  ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या उत्साहात तारे-तारका सहभागी होताना दिसतायत. यात आता क्रीडाविश्व देखील मागे नाहीये. अनेक दिग्गज खेळाडूंचे काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यात ते थिरकताना, दांडिया खेळताना दिसतायत. भारतीय क्रीडा प्राधिकरणानं म्हणजे एसएआयनं (SAI)  गरबा खेळताना दिग्गज खेळाडूंचे व्हिडीओ (Video) पोस्ट केले आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारताला दोनदा पदक मिळवून देणारी बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूनं आणि तिला साथ देताना बॅडमिंटनपटू तिरुपती मुरुगंडेसह बॉबी जॉर्ज देखील दिसत आहे. यावेळी बजरंग पुनियाचा अंदाज बघण्यासारखा आहे.

सध्या गुजरातकडे अवघ्या देशाच्या नजरा लागल्या आहेत. याठिकाणी राष्ट्रीय खेळ खेळले जातयत . नवरात्री चालू असल्यानं याठिकाणी उत्साहाचं  वातावरण आहे. या राज्यात नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

हा व्हिडीओ पाहा

हे तुम्हाला माहितच आहे की नवरात्रीच्या गरब्यानं गुजरातची विशेष ओळख आहे. या उत्सवात राज्यभर गरबा मोठ्या उत्साहात खेळला जातो. तरुण पिढी यात सक्रिय सहभाग घेते. अशा वेळी खेळाडू तिथे उपस्थित असताना गरब्यापासून दूर राहूच शकत नाही. तुम्हाला सध्या सुरु असलेल्या नवरात्रीत अनेक खेळाडू सहभाग घेताना दिसत आहे.

हा व्हिडीओ पाहा

गरबा सादर करण्यापूर्वी सिंधूनं गुजरातमधील आणखी एक प्रसिद्ध गोष्ट पाहिली. गुजरातमधील सुरत शहर हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. गरबा सादर करण्यापूर्वी सिंधू सूरतमधील हिऱ्यांच्या खाणीत गेली आणि तिथे तिनं हिरे बनवताना पाहिलंय.

हा व्हिडीओ पाहा

भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाही नवरात्रोत्सवात सहभागी होताना दिसत आहे. बजरंगनं गरबाही केलाय. बजरंग पूर्णपणे गरब्यात सजला होता. त्यानं या नृत्यासाठी प्रसिद्ध पारंपारिक ड्रेस परिधान केला होता. बजरंगनंही जोरदार गरबा खेळला. पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या निषाद कुमारनं यावेळी गरबा खेळला.

प्रवीण कृष्णा, अमोज जेकब आणि जसविन ऑल्ड्रिन यांनीही गरबा खेळला. तिघंही या डान्सचा पुरेपूर आनंद घेताना दिसत होते. तिघांनीही मोठ्या मजेनं आनंद घेतला. यावेळी खेळाडूंचे नातेवाईकही उपस्थित होते.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.