ODI World Cup 2023 संघाची घोषणा झाल्यावर ‘या’ खेळाडूचा निवृत्तीचा मोठा निर्णय!
World Cup Squad 2023 : वर्ल्डकप साठी संघ जाहीर करण्याचा आज शेवटचा दिवस असून टीम इंडियाची बीसीसीआयने घोषणा केली आहे. एका खेळाडूने संघ जाहीर झाल्यावर निवृत्तीचा निर्णय जाहीर केलाय.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरु व्हायला अवघा एक महिना बाकी असून आज वर्ल्ड कप संघाची घोषणा करायचा अंतिम दिवस होता. बीसीसीआयकडून टीम इंडिया जाहीर करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या दोघांमध्ये रस्सीखेच होती मात्र दोघांचीही निवड झाली आहे. त्यासोबतच ईशान किशन आणि के. एल. राहुल यांच्यातील एकजणाची निवड होईल अशा चर्चा केल्या जात होत्या. त्या दोघांचीही संघात निवड झाली आहे. भारतासोबतच दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा झालीये. संघाची घोषणा झाल्यावर स्टार खेळाडूने निवृत्तीबाबत घोषणा केली आहे.
यंदाचा वर्ल्ड कप भारतामध्ये होणार असून टीम इंडिया प्रबळ दावेदार मानलं जात आहे. संघांची घोषणा झाल्यावर काही खेळाडूंची निवड न झाल्याने ते नाराज झाले आहेत. अशातच एका खेळाडूने संघात निवड होऊनही निवृत्ती जाहीर केली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून क्विंटन डी कॉक आहे.
भारतामध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपनंतर क्विंटन डी कॉक हा निवृत्ती घेणार आहे. डी कॉक याचा दक्षिण आफ्रिकेच्या संघात वर्ल्ड कप निवड झालेली असताना त्याने निवृत्तीबाबत सांगितलं आहे. याआधीही डी कॉकने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आताच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडलेल्या वन डे मालिकेमध्ये 3-0 ने आफ्रिकेचा पराभव झाला होता. या मालिकेमध्ये क्विंटन डी कॉ याला विश्रांती देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका विश्वचषक संघ: टेम्बा बावुमा (C), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, सिसांडा मागाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, शम्सी. रासी व्हॅन डर डुसेन