R Ashwin याचं इंग्लंड विरुद्ध खास शतक, टीम इंडिया जोमात, इंग्लंड कोमात
R Ashiwn IND vs ENG | टीम इंडिया ऑफ स्पिनर आर अश्विन याने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी खास शतक झळकावलं आहे.
रांची | टीम इंडियाचा दिग्गज अनुभवी ऑलराउंडर आर अश्विन याने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. अश्विनने इंग्लंडच्या बॅटिंग दरम्यान खास शतक ठोकत कीर्तीमान केला आहे. इंग्लंडने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. आर अश्विन याने या सामन्यात वैयक्तिक पहिली विकेट घेत हे खास शतक पूर्ण केलं. अश्विन याने यासह ऐतिहासिक कामगिरी केली. अश्विनने एका टीम विरुद्ध 100 विकेट्स आणि 1 हजार धावा पूर्ण केल्या. अश्विन एका टीम विरुद्ध विकेट्सचं शतक आणि हजार धावा करणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला.
जॉनी बेयरस्टो हा अश्विनचा 100 वा शिकार ठरला. अश्विनने जॉनी बेयरस्टोला एलबीडब्ल्यू आऊट केलं. अश्विनने यासह इंग्लंड विरुद्ध विकेट्सचं शतक पूर्ण केलं. अश्विनने याआधीच इंग्लड विरुद्ध 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अश्विन याच्याआधी ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन हा 100 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र त्याला 1 हजार धावा काही करता आलेल्या नाहीत. तर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज शेन वॉर्न यानेही इंग्लंड विरुद्ध 100 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या.
अश्विनच्या नावावर आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध कसोटीमध्ये 1 हजार 85 धावा आणि 100 विकेट्स आहेत. तसेच अश्विन इंग्लंड विरुद्ध 100 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय आहे. अश्विनआधी टीम इंडियाकडून इंग्लंड विरुद्ध बी चंद्रशेखर यांनी 95 विकेट्स घेतल्या होत्या.
अश्विन सातवा खेळाडू
दरम्यान अश्विन एका टीम विरुद्ध 100 विकेट्स आणि 1 हजार धावा करणारा एकूण सातवा आणि पहिला भारतीय ठरला आहे. अश्विनआधी अशी कामगिरी एकूण 6 खेळाडूंनी केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे जॉर्ज जिफेन आणि मोंटी नोबेल या दोघांनी इंग्लंड विरुद्ध ही कामगिरी केली आहे. तर इंग्लंडच्या विलफ्रेड रोड्स, इयान बॉथ्म आणि स्टुअर्ट ब्रॉड या तिघांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध हा कारनामा केला आहे. तर वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्स यांनी इंग्लंड विरुद्ध हा कीर्तीमान केला आहे.
टीम इंडियाकडून अश्विनचं पहिलंवहिलं पण स्पेशल शतक
A special 💯! 👏 👏
1⃣0⃣0⃣th Test wicket (and counting) against England for R Ashwin! 🙌 🙌
Follow the match ▶️ https://t.co/FUbQ3Mhpq9 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/uWVpQnx3jz
— BCCI (@BCCI) February 23, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.